Aditya L1 mission 2023 information in marathi | आदित्य एल १ सोलर मिशन Latest Update

Aditya L1 mission 2023 information in marathi | Aditya- L1 Solar mission ready for launching मित्रांनो चांद्रयान मिशन नुकताच यशस्वी झाला . या यशानंतर भारतीय स्पेस एजन्सी इसरो ने सूर्याचं अभ्यास करण्यासाठी आदित्य एल१ मिशन हाती घेतलं आहे या मिशन ची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Aditya L1 Mission

आदित्य-एल१ चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन या अंतराळ केंद्रातून केले जाईल. या प्रवासादरम्यान आदित्य-एल१ १.५ दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करेल. म्हणजेच ते सूर्यापासून १४ कोटी ८५ लाख किलोमीटर दूर, पृथ्वीच्या जवळ असेल. तर १.५ दशलक्ष किलोमीटरचे अंतर चंद्राच्या अंतरापेक्षा चारपट जास्त आहे. हा प्रक्षेपणासाठी PSLV-XL या रॉकेटचा वापर केला जाणार आहे आहे. ज्याचा क्रमांक PSLV-C57 आहे. या रॉकेटद्वारे हा यान आकाशात झेप घेणार आहे .

Aditya L1 Mission Launching Date 

आदित्य एल1 मिशन 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. आदित्य एल1 मिशन ही भारतीय अंतराळ संस्था इस्रोची सूर्याचा अभ्यास करणारी पहिली मोहीम आहे.

 

 

ADITYAL1 large.png
image- ISRO

लॅग्रेंज पॉईंट L-1 नेमकं म्हणजे काय ?

सर्व ग्रहाजवळ असे काही पाॅईंट असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती यांच्यात संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याच्या तेथून परीक्षण करून निरीक्षणे नोंदवणे, त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य असते. आपली पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच पाॅईंट निश्चित करण्यात आले आहेत. त्या पॉईंटना त्यांना लॅग्रेंज पॉईंट 1 ते 5 अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी L-1 या पाॅईंटपर्यंत आदित्य यान जाणार आहे.

 

Aditya L1 mission
image- ISRO

 

लॅग्रेंज पॉईंट 1 (Lagrange Point) L1 ची निवड-

ISRO ला सूर्याच्या होणाऱ्या सर्व क्रियांचा अभ्यास करायचा आहे. जे सूर्याच्या पृष्ठभागावरुन बाहेर पडतात आणि अवकाशात पसरतात आणि काहीवेळा पृथ्वीच्या दिशेने देखील येतात, जसे की कोरोनल मास इजेक्शन, सोलर फ्लेअर्स, सौर वादळे इत्यादी . म्हणून, लॅग्रेंज पॉइंट 1 (L-1) या संदर्भात एक विशेष स्थान आहे, कारण कोरोनल मास इजेक्शन आणि सूर्यापासून निघणारी सौर वादळे या मार्गाने पृथ्वीकडे जातात. L1, L2 आणि L3 या तीन पाॅईंटची जागा निश्चित नसते. तर L4 आणि L5 स्थिर आहेत आणि त्यांची स्थिती बदलत नाही.

L3 बिंदू सूर्याच्या मागे आहे. L1 आणि L2 बिंदू थेट सूर्याच्या समोर आहे. त्यामुळे संशोधनाच्या दृष्टीकोनातूनही L-1 हा बिंदू अतिशय योग्य मानला जातो, कारण तो पृथ्वीच्या जवळ आहे आणि येथून दळणवळण करणे खूप सोपे आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पाच लॅग्रेंज बिंदू आहेत. या टप्प्यावर अवकाशयानाचे गुरुत्वाकर्षण केंद्राभिमुख बलाच्या बरोबरीचे होते. त्यामुळे कोणतेही वाहन येथे दीर्घकाळ थांबून संशोधन करू शकते. या जागेला ‘स्पेस पार्किंग’ असेही म्हणतात, कारण या ठिकाणी अंतराळयान अगदी कमी इंधनात स्थिर होऊ शकते. हाच L-1 पाॅईंटचा फायदा आहे .

Aditya L1 mission सूर्याचा अभ्यास करणारी साधने

 1. सूर्याच्या कोरोनाची प्रतिमा काढण्यासाठी कोरोनाग्राफ चा वापर होईल .
 2. सूर्याच्या स्पेक्ट्रमचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रोमीटर चा वापर होईल .
 3. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी मॅग्नेटोमीटर चा वापर होईल .
 4. सूर्याच्या प्लाझ्माचा अभ्यास करण्यासाठी प्लाझ्मा डिटेक्टर चा वापर होईल .
 5. सूर्याच्या उष्णतेचा अभ्यास करण्यासाठी रेडिओमीटरचा वापर होईल .
 6. सूर्याच्या ऊर्जावान कणांचा अभ्यास करण्यासाठी कण शोधक चा वापर होईल .
 7. सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी एक दुर्बिण चा वापर होईल .

 

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

 Super Blue Moon 2023 

 

आदित्य- L1 मिशनची प्रमुख उद्दिष्ठे कोणते

 • सूर्याच्या कोरोनामधून बाहेर पडणाऱ्या उष्णता आणि उष्ण वाऱ्यांचा सखोल अभ्यास आदित्य एल१ करणार आहे.
 • सौर वातावरनाच अभ्यास समजून घेण्याचा प्रयत्न करेल.
 • सौर वादळे, सौर लहरी आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम व याचे कारण अभ्यासणार आहे.
 • सौर वाऱ्यांचे वितरण आणि तापमानाचा सखोल अभ्यास करेल.
 • सौर कोरोनामध्ये चुंबकीय क्षेत्र टोपोलॉजी आणि चुंबकीय क्षेत्र मोजमाप.

 

चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

 

Aditya L1 Mission budget

अंतराळ संशोधनासाठी सल्लागार समितीने आदित्य, सौर निंबसचा अभ्यास करण्यासाठी सौर उपग्रह, सुरुवातीला कोरोनग्राफसह 400 किलोचा LEO उपग्रह विकसित केला. त्याची किंमत अंदाजे ₹400 कोटी आहे . यामध्ये प्रक्षेपणाचा हि खर्च जोडला आहे.

Aditya L1 आता कुठे आहे ?

भारतातील पहिल्या सूर्य मिशन आदित्य एल1 हा सूर्य-पृथ्वी L1 बिंदूच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे.
आदित्य एल1 (Aditya L1) हा सुरळीतरित्या कार्यरत आहे . लवकरच चांद्रयान प्रमाणेच आदित्य एल1 हा यशस्वी होणार आहे.

aditya l1 update

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?