Bhandara News: शासन आपल्या दारी अभियान, भंडारा जिल्ह्यातील पोलिसांना मिळाल्या नवीन गाड्या :

Bhandara News: शासन आपल्या दारी राज्य शासनाचा हा अभियान भंडारा जिल्यामध्ये आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जनतेला संबोधन केले .

ते म्हणाले शासन आपल्या दारी (Shasan aplya dari) या कार्यक्रमाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते त्यावर टीका करत आहेत. जे आयुष्यभर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन इव्हेंटबाजी करत यात्रा काढत आहेत तेच आज या कार्यक्रमाला नावे ठेवत आहेत, सरकारची नियत चांगली नसती तर शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत, १ रुपयात पीक विमा आणि सततच्या पावसामुळं होणाऱ्या नुकसानीला मदत देण्याचे निर्णय आम्ही घेतले नसते. उलट लोकांना आमची नियत माहीत आहे त्यामुळेच त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन तृतीयांश पेक्षा अधिक जागी महायुतीच्या उमेदवारांना निवडून दिले असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

राज्यातील कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी १ रुपयात पीकविमा ही अत्यंत प्रभावी योजना सूरु करण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र आणि राज्य असे मिळून १२ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आपण देत आहोत. जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून धानावरील बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करण्यात येईल असे सांगून आश्वस्त केले.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील २ लाख १० हजार लाभार्थ्यांना ३०४ कोटींच्या शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.

यावेळी बोलताना, सर्वसामान्य लोकांचा वारंवार शासकीय कार्यालयात जाण्याचा त्रास वाचावा आणि सर्व शासकीय योजनांचे लाभ एकाच वेळी एकाच ठिकाणी घेता येणे शक्य व्हावे यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सूरु केला असल्याचे आवर्जून सांगितले. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा लाखाहून अधिक लाभार्थ्यांची नोंद झाली असून त्यातील २ लाख १० हजार नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

PM Vishwakarma Yojana 2023 | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना | How to Apply 

शासन आपल्या दारी (Shasan aplya dari) या कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांना विविध वस्तुंचे वाटप करण्यात आले. तसेच भंडारा जिल्ह्यातील पोलिसांना देण्यात आलेल्या नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच शेतात फवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनची देखील यावेळी चाचणी घेतली.

shasan aplya dari
Bhandara News: Shasan aplya dari

 

शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी अभियानाचा पुढचा टप्प्याचा कार्यक्रम भंडारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी भंडारा शहरामध्ये नव्याने करण्यात आलेल्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शहरातून मिरवणूक देखील काढण्यात आली.

यावेळी आदिवासी विकास मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी मंत्री परिणय फुके, किरण पांडव, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक केलींग दोरजे, पोलीस अधीक्षक लोहित मताणी तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच आणि लाभार्थी उपस्थित होते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती 

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?