चंद्रयान 3 मिशन बद्दल संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023

Chandrayan 3 Mission Launch Detail Information In Marathi 2023 नमस्कार मित्रांनो आज आपण चंद्रयान 3 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, यासाठी किती खर्च आला ? अशाच काही बाबी बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आतापर्यंत जे काही मोहिम हाती घेतल्या होत्या. त्या प्रकरपणे पार पाडल्या जसे की, मंगल यान ,चंद्रयान 1,चंद्रयान 2, या मोहीम भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) पार पाडल्या आहेत. परंतु चंद्रयान 2 चंद्रावर लँड आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर चंद्रयान दोन ही मोहीम अपूर्ण राहिली होती. परंतु आता भारताने चंद्रयान 3 मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम अतिशय महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे.

भारताने आता चंद्रावर चांद्रयान 2 नंतर अजून एक मोहीम आखली आहे, ती म्हणजे चंद्रयान 3 मोहीम. या अंतराळ मोहिमेमुळे भारत देश चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश बनणार आहे. याआधी ज्या चांद्रयान मोहिमा झाल्या त्यात चंद्रावर उतरण्यासाठी भारताला अपयश आले होते. चांद्रयान 3 आगोदर चंद्रयान 1 आणि 2 अशा चांद्र मोहिमा भारताने पार पाडल्या. पहिली जी चांद्रयान 1 मोहिम होती ती 22 ऑक्टोबर, 2008 रोजी यशस्वी रित्या पार पडली.

आणि त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे दिनांक 22 जुलै, 2019 रोजी पुन्हा एकदा भारताने साहस करत अशक्य प्राय अशा रीतीने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याचे योजले ते चंद्रयान 2 च्या रुपात, पण दुर्दैवाने काही सेकंदा पूर्वीच चांद्रयान 2 चा संपर्क तुटला. यामुळे चंद्रयान 2 मिशन Fail झालं. पण आता चांद्रयान 2 चे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा चांद्रयान 3 सज्ज झाले आहे. आता लवकरच हे चंद्रयान 3 अवकाशात झेपावले जाणार असून, जर ही चंद्रयान मोहिम 3 फत्ते झाली की भारत हा जगातील चौथा असा देश बनेल ज्यांनी चंद्रावर यान सुरक्षित रित्या पाठवले.

Emergency Alert Severe Notification 2023 | भारत सरकारच्या नावाने तुमच्या फोनवर आलयं काय ? पहा संपूर्ण माहिती 

एल व्ही एम (LVM) 3 (What is LVM in Marathi):-

एल व्ही एम (LVM) 3 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) चे अतिशय महत्त्वपूर्ण प्रक्षेपण यान आहे. एल व्ही एम ची उंची 43.50 मीटर उंच इतकी आहे. तर याचे वजन 640 टन आहे. एल व्ही एम मध्ये 8 ते 9 हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे. भारतातील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान म्हणून एल व्ही एम (LVM) ओळखले जाते. एल व्ही एम चे तीन स्तर आहेत.

Chandrayan 3 Mission

5 जून 2017 रोजी या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने इस्रो ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘ जी एस एल व्ही एम के 3 ‘(GSLV MK 3) पहिली कक्षा चाचणी प्रक्षेपित केली होती. ‘एलव्हीएम3’ चे ‘चंद्रयान 3 ‘हे 7 प्रक्षेपण असणार आहे. ‘चंद्रयान 2’ चे प्रक्षेपणही 2019 मध्ये याच प्रक्षेपण अस्त्राद्वारे झाले होते. ‘एल व्ही एम 3’ मध्ये कमी उंचीच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत म्हणून मानवी मोहिमांसाठी हे उपयुक्त असल्याचे इस्रो कडून सांगण्यात आले आहे.

चंद्रयान 3 मिशन 2023 (Chandrayan 3 Mission Launch):-

चंद्रावर जात असलेले हे भारतीय अंतराळ संशोधन (ISRO ) यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नाही असे सांगितल्याची माहिती आहे. म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञान करिता चंद्रयान 3 मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे . चंद्रयान 2 नंतर भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे. परंतु आपल्या देशातील(Technology )तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे.
ISRO संस्थेचा महत्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट आता 14 तारखेला अवकाशात झेपणार आहे. चंद्रयान 3 मोहिम ही चंद्रयान 2 प्रमाणेच आहे, परंतु यात Soft Landing केली जाणार की नाही याची माहिती मिळालेली नाही.परंतु हे चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे.या मोहिमे अंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर एक लँडर उतरवण्यात येणार. या लँडरला एक रोवर आहे.

हा रोवर चंद्राच्या जमिनीवर फिरेल, आणि तिथे काही प्रयोग करेल. हे लँडर चंद्रावर एक लूनार दिवसपर्यंत राहील. एक लूनार दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस असतात. चांद्रयान-3 च्या लँडरसाठी सूर्यप्रकाश असणं जरुरीचा आहे. चंद्रावर 14-15 दिवस सूर्य उगवतो, तर पुढचे 14-15 दिवस सूर्य उगवत नाही. त्यामुळे फक्त 14 दिवसांची ही महत्वाची अशी चंद्रयान-3 मोहिम आहे.

All Chandrayan Mission Launch By ISRO

Chandrayan 1 mission Launch Date 22 Oct 2008
Chandrayan 2 mission Launch Date 22 July 2019
Chandrayan 3 Mission Launch Date14 July 2023

 

जगात सर्व प्रथम चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचनारा भारत :-

भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.

vikram min

भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.

vikram min

 

Threads App Launched By Meta 2023

 

चंद्रयान-3 या मोहिमेचा बजेट किती आहे? (Chandrayan 3 Mission Cost Budget):-

Chandrayan 3 Mission चंद्रयान-3 मोहिमेसाठी एकूण खर्च हा 651 कोटी रुपये इतका आहे, आणि मोहिमेसाठी शासनाने 651 कोटी रुपये बजेट दिले आहे.जगातील एकूण इतर 3 देशांनी आतापर्यंत चांद्रयान मोहिम सफलता पूर्वक पूर्ण केली आहे. त्यात अमेरिका, चीन, रशिया आणि आता 14 तारखे नंतर या लिस्ट मधे आपला भारत पण येणार आहे. आशा आहे कि आपल्याला या चंद्रयान ३ मिशन बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद ….

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?