सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases | Dolyachi Sath latest Update 2023

Eye Diseases Viral | Eye Flu viral | Dolyachi Sath latest Update | मित्रांनो गेल्या काही दिवसांत डोळे येण्याची साथ वाढते आहे, डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. या डोळ्याच्या साथीने जिकडे तिकडे लोक त्रस्त झाले आहेत, डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. काहीवेळा संसर्गामुळे डोळे येतात तर काहीवेळा अॅलर्जीमुळे डोळे येतात. या रोगाची लक्षणे कारण आणि दक्षता कशी घ्यावी तसेच, या परिस्थितीत आपण स्वतः आणि आपल्या परिवाराची काळजी कश्या प्रकारे घ्यावी. या बद्दल आपण या लेखात पाहणार आहोत…

डोळ्यांच्या साथीची कारणे (Eye Flu Viral):-

संसर्गामुळे डोळे आल्यास खालील प्रमाणे लक्षणे दिसतात.
 • डोळ्याच्या कडा लाल होणे
 • डोळ्याच्या पापण्या एकमेकांना चिकटणे
 • डोळ्यात टोचणे
 • डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
 • अॅलर्जीमध्ये डोळे खूप दुखतात.
 • दोन्ही डोळ्यांना एकाचवेळी त्रास सुरू होतो
 • दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे .
  डोके दुखत राहते
विषाणूंचा प्रभावामुळे डोळे येणे.

डोळे येणे हे सामान्यत: संसर्गामुळे होते. जंतू किंवा बॅक्टेरिया किंवा विषाणू हे डोळे येण्यास कारणीभूत आहेत. सर्दीमुळेही डोळे येऊ शकतात आणि सर्दीमुळे डोळे येण्याच्या साथीचा प्रसारही होऊ शकतो. त्याचप्रकारे रसायने, द्रव्ये, वायू यामुळे मोठ्या प्रमाणात डोळे येतात. तीव्र प्रकाशकिरणांमुळे डोळे झोंबतात. काही दिवसांनी सुजतात. अलीकडे, कॅान्टॅक्ट लेन्स वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या लेन्स डॅाक्टरी सल्ल्याने न घेता स्वतःच घातल्यास अपाय होतो. तसेच, कोणत्याही गावठी कंपनीचे काजळ आणि सौंदर्यप्रसाधनांचा वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी कमालीचा घातक असतो. त्यांचा वापर टाळायलाच हवा.

जननी सुरक्षा योजना (JSY) संपूर्ण माहिती मराठी 2023

 

डोळे आल्यानंतर यावर दक्षता (Eye Flu Viral Efficiency):-

 • डोळ्यांवर थंड पाण्याचा सतत हबका मारणे.
 • पाण्याने डोळ्यात साठणारा मळ स्वच्छ करणे.
 • डोळ्याची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसांनंतरही कमी होत नसल्यास डॅाक्टरी सल्ला घेणे.
 • डोळ्याचा दाह कमी करण्यासाठी प्राथमिक उपचार म्हणून गुलाबपाण्याच्या घड्याही ठेवल्या जातात.
 • डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये.
 • तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घ्यावेत.
 • डोळे आलेल्या व्यक्तींचे कपडे, टॅावेल इतरांनी मुळीच वापरू नयेत.
 • डोळे आल्यानंतर बाहेर जास्त फिरू नये.
 • बाहेर फिरायचे असेल तर डोळ्याला चष्मा वापरत जा.
 • दूध आणि सहद सारख्या प्रमाणात मिश्रण करून चेहरा साफ करावे.
 • डोळे आलेल्या जागेवर फर्फाने शेकून घ्यावे .

(Eye Flu Viral) डोळे आल्यानंतर त्यांना बरे व्हायला जरा वेड लागतो, म्हणून वर दिलेले सर्व उपायांचा पालन करा. अश्याप्रकारे दिलेली सर्व माहिती समजली असेल, हा लेख सर्व ग्रुप मध्ये पाठवा धन्यवाद….

3 thoughts on “सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases | Dolyachi Sath latest Update 2023”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?