शेळीपालन व्यवसायाबद्दल सर्व माहिती | Goat Farming Business Best Idea in 2023 | शेळीपालन व्यवसाय करून मिळवा महिन्याला लाखो रुपये

Goat Farming Business शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्प भूधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे.खाद्याचे, शेळयांच्या आरोग्याचे, निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो.बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो.शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय कसा करायचा याचे चारा व्यवस्थापन, आरोग्य इत्यादी, या Goat Farming Business व्यवसायाबद्दल सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत…

बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना गोट्या मध्येच पुरवला जातो.अर्ध बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोगळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे.

शेळ्यांच्या देशी जाती :-

भारतात बकऱ्यांच्या सुमारे २५ जाती आहेत.जमनापरी, बिटल, सुरती,मारवाडी, बारबेरी वगैरे जाती दूध उत्पादनास तर बिटल, उस्मानाबादी,सुरती,संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मांसासाठी वापरल्या जातात. यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षास सुमारे २५ किलो इतकी होते.

 • उत्तराखंड, जम्मूकाश्मीर, हिमाचल प्रदेश या भागांत काश्मिरी, चांगथांगी, चेंगू किंवा पश्मिना शेळ्या आढळतात.
 • पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांत जमुनापरी, बारबेरी, बीटल या प्रजातीच्या शेळ्या आहेत.
 • गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या कोरड्या भागांत कच्छी, काठेवाडी, जाखराणी, झालावाडी, मारवाडी, मेहसाणा, बेरारी, सिरोही या प्रजाती आढळतात.
 • दक्षिणी भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू राज्यांत उस्मानाबादी, कन्नीआडू, मालवारी, संगमनेरी, सुरती या प्रजाती जास्त दिसतात.
 • पूर्व भारतात आसाम हिल, गंजाम, ब्लॅक बेंगॉल या प्रमुख शेळ्या आहेत. यापकी ब्लॅक बेंगॉल शेळी पश्चिम बंगालमध्ये आढळते. तिची कातडी मऊ असल्याने परदेशात तिला चांगली मागणी आहे.
 • महाराष्ट्रात प्रामुख्याने उस्मानाबादी, कोकण कन्याळ, बोएर, संगमनेरी , काठेवाडी शेळ्या आढळतात.

 • उस्मनाबादी, संगमनेरी शेळ्या लातूर, बीड, परभणी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर भागांत आढळतात.उस्मानाबादी शेळीचा रंग प्रामुख्याने काळा असतो. कान लोम्बकळणारे, शिंगे मागे वळलेली, कपाळ बहिर्वक्र असते. उंची ६५ ते ७० सेमी असते. जन्मतः वजन २.५ किलो व पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन ३० ते ३५ किलो व बोकडाचे वजन ४५ ते ५० किलो.
 • संगमनेरी शेळीचा उगम अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेर येथील आहे. ती दूध व मांसासाठी प्रसिद्ध आहे.
 • उस्मानाबादी शेळीचा उगम उस्मानाबाद येथील असून ती मांसासाठी प्रसिद्ध आहे. तिच्यामध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे.
 • कोकणातील उष्ण, दमट हवामान व जास्त पावसाच्या प्रदेशात तग धरण्याची क्षमता असलेली कोकण कन्याळ शेळी विकसित करण्यात आली आहे. तिच्या अंगावर काळा रंग व त्यावर पांढरे पट्टे असतात. ही शेळी अतिपावसातही तग धरू शकते. तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

शेळ्यांच्या आहार :-

 1. शेळीच्या वजनाच्या किमान ०.% खुराक,% वाळलेला चारा,.५०% हिरवा चारा असे साधारणतः आहाराचे प्रमाण असते.चाऱ्याचे लहान तुकडे करून दिल्यास सुमारे २५ ते ३०% चाऱ्याची बचत होते.
 2. पिल्लांना जन्मानंतर १.५० महिना आईचे दूध मिळालेच पाहिजे.तसेच त्यांना लुसलुशीत पाला,खुराक देता येते.दिड महिन्यानंतर त्यांचे दूध तोडावयास हवे.त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा.
 3. शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका ,तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे.
 4. शेळ्यांच्या खुराकामधे शेंगदाणा पेंड , सरकी पेंड असावी.

शेळीपालनाची कारणे :-

Goat Farming Business सर्वसाधारणपणे दुधाची व कौटुंबिक गरज भागविण्यासाठीच पाळण्याची प्रथा जगभर आढळते. दुग्धोत्पादनाच्या बाबतीत गायीपेक्षा शेळी कमी प्रतीची असली तरी शारीरिक आकारमानाचा विचार करता दुधाळ शेळ्या गायीपेक्षा किती तरी अधिक दूध देतात. समशीतोष्ण कटिबंधातील शेळ्या पचण्याजोग्या दर १०० किग्रॅ. अन्नापासून १८५ किग्रॅ. दूध तयार करू शकतात तर गायी एवढ्या अन्नापासून १६२ किग्रॅ. दूध तयार करतात. शिवाय ओसाड निर्जल प्रदेशांत त्या गायीपेक्षा सरस आहेत. मात्र वर्षभर सतत दुग्धोत्पादन करण्याच्या दृष्टीने शेळी कमी प्रतीची आहे.

मत्स्यपालन व्यवसायाची माहिती

 

शेळीपालनाच्या पद्धती :-

बंदिस्त पद्धत व अर्धबंदिस्त पद्धत या शेळीपालनाचे दोन प्रकार आहेत

Goat Farming Business

बंदिस्त पद्धत :-

या पद्धतीत शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे ओरबाडतात.यामुळे बकरीने तोंड लावलेल्या झाडांची वाढ खुंटते.तसेच यामुळे झुडपांचा व जंगलाच नाश होतो असा समज आहे. बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी गोठा आवश्यक आहे. तो गोठा उंचवट्यावर,मुरमाड जमिनीत व पाण्याचा निचरा होऊ शकेल अशा ठिकाणी असावा.शेळ्यांना प्रत्येकी १० ते १२ चौ.फूट, करडांना (पिल्लांना)२ ते ५ चौ.फू. व बोकडास २५ चौ.फू. जागा लागते. अशा प्रकारे संख्या बघून गोठा उभारावा.याशिवाय गोठ्याबाहेर त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

 1. गोठ्यात चारा पाण्याच्या आधुनिक सोयी असाव्यात.
 2. गाभण, आजारी, पिल्ले, बोकड यांचे साठी विशेष कप्पे असावेत.
 3. शेळ्या वेल्यानंतर त्यांना व पिलांसाठी कप्पे असावेत.
 4. प्रथमोपचार व औषधांसाठी वेगळी सोय असावी.
 5. वेळेवर लसीकरण गरजेचे असते. यात पी पी आर, इ टी व्ही या लसी महत्त्वाच्या आहेत.
 6. शेळ्यांना चारा हा तुकडे करून द्यावयास हवा.
 7. शेळ्यांचे लसीकरण व जंतूनाशकांचा योग्य वापर करावा.
 8. तेथील शेळ्यांचा विमा काढण्यात यावा.
 9. संख्या जास्त असल्यास वेगळे भांडार खाद्यासाठी असावे.
 10. गोठा हा पाऊस, ऊन, थडी यापासून सुरक्षित असावा.

अर्धबंदिस्त पद्धत :-

या पद्धतीत शेळ्या या विशेषतः फिरणारे जानवर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना नैसर्गिकपणे फिरून चारा व झाडपाला ओरबाडण्याची सवय असते. त्यांना गोठ्यात कोंडून ठेवल्यास व्यायाम मिळत नाही. त्यांना फिरवून आणल्याने त्यांचे खूर वाढत नाहीत.

 1. बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत.
 2. व्यवस्थापन, गोठा बांधणी व देखभाल खर्चात बचत होते.
 3. शेळ्यांचा व्यायाम होतो यामुळे आरोग्य चांगले राहते तसेच पाणी जास्त पिले जाते.

भारतातील मशरूम शेती व्यवसाय

 

शेळीपालन व्यवसायाचे फायदे (Goat Farming Business Benifits) :-

 • Goat Farming Business हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.
 • काही जातीच्या शेळ्या या 14 महिन्या मध्ये दोनदा वितात या मुळे अधिक उत्पन्न मिळते.
 • शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.
 • पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकुन तो उभा करता येऊ शकतो.
 • शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते.
 • त्यांचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.
 • लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास जागा कमी लागते.
 • त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.
 • बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे.
 • यांचे शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात.

आशा आहे कि आपल्याला Goat Farming Business या व्यवसायाबद्दल सर्व माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?