हर घर तिरंगा अभियान 2023 | Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi | ध्वजारोहणाचे नियम कोणते ?

Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi : हर घर तिरंगा अभियान  हा भारत सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर केला. हा अभियान भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या अभियानांतर्गत, सरकारने सर्व नागरिकांना त्यांच्या घरांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. या वर्षी सुद्धा हर घर तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट 2023 या काळात सुरू राहील.चला तर मग मित्रांनो या अभियानात सहभागी होण्यासाठी काय नियम आहेत हे आपण या लेखात पाहणार आहोत..

Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi

15 ऑगस्ट रोजी भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘ हर घर तिरंगा ‘ अभियान राबवण्यात येत आहे. Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘ हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. प्रत्येक स्वतंत्र देशाचा एक राष्ट्र ध्वज असतो. भारताच्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ असे म्हणतात.

हर घर तिरंगा अभियान या अभियानाच मुख्य उद्देश ?

हर घर तिरंगा Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे लक्ष्य निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत ‘हर घर तिरंगा’ या मोहीमेबद्दल माहिती दिली होती. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते.

1947 साली 22 जुलै रोजी तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला होता, आज देशभरात तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे, मात्र एक काळ असा होता की प्रत्येक घरात ध्वजारोहण करता येणे शक्य नव्हते. बऱ्याच बदलांनंतर सामान्य जनतेचे घर, ऑफीस, कार्यालये आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करणे शक्य झाले. 2002 मध्ये ध्वजारोहणाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर सामान्य नागरिकांना हा अधिकार मिळाला.स्वातंत्र्य लढ्यामध्ये अज्ञात सैनिक जवान क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्यामध्ये घडलेल्या विविध घटना याची आठवण व्हावी, देशभक्तीची जाज्वलय भावना कायमस्वरूपी जन्मनात रहावी.

 

Top 5 5G mobiles under 15000 In India | 15 हजारांपेक्षा कमीमध्ये येणारे हे सुपरहिट स्मार्टफोन्स

 

ध्वजारोहणाचे नियम कोणते ?

फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2.1 नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी, खासगी जागेत किंवा शैक्षणिक संस्थेत ध्वजारोहणाचा अधिकार आहे. मात्र ध्वजारोहणावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1971 च्या Prevention of Insults to National Honour Act अंतर्गत काही नियम असून त्याचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे. हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावण्यापूर्वी काही नियम जरूर जाणून घ्या व त्यांचे पालन करा . खाली दिलेले नियम वाचून घ्या.

  1. ध्वजारोहण करताना हे लक्षात ठेवावे की, तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्वाचा आहे. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये.
  2. तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वरती असला पाहिजे पाहिजे.
  3. राष्ट्रध्वज कोणासमोरही झुकवू नये.
  4. तिरंग्याच्या आसपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.
  5. तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही गोष्ट अथवा वस्तू नसावी. त्यामध्ये फुलं, माळा यांचाही समावेश आहे.
  6. ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.
  7. तिरंग्याचा कधीही एखादा पेहराव म्हणून वापर वापर करू नये.
  8. आपला रुमाल, उशी किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करू नये. तसेच तिरंग्यावर कधीही, काहीही लिहू नये.
  9. झेंडा जमिनीवर पडू न देणे तसे झाल्यास झेंड्याचा अपमान होतो, देशाचा राष्ट्राचा अपमान होतो, आणि
  10. जबाबदार व्यक्तीला यात शिक्षा तीन वर्षे होऊ शकते आणि दंडही ठोठावू शकतात
  11. झेंड्याचा नेहमी सन्मान केला पाहिजे रस्त्यावर झेंडा पडला असेल तर एका ठिकाणी जमा करावं खेडे असेल तर ग्रामपंचायत मध्ये जमा करावा आणि शहर असेल तर युवकांनी हे जमा करण्याचे काम करावे.

या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे करावे..

Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi

हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत

  • सर्वप्रथम http://www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यामध्ये Pin a flag या पर्यायावर क्लिक करा .
  • त्यानंतर रिकाम्या रकान्यांमध्ये विचारलेली माहिती भरा.
  • यात व्यक्तीचं नाव, फोन नंबर अशा तपशीलाचा समावेश असेल.
  • गुगल अकाऊंटवरुनही या पेजवर थेट माहिती भरता येईल.
  • तुमची लोकेशन अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी वेबसाईटला द्या.
  • नंतर पुन्हा pin a flag वर क्लिक करा.
  • Download ऑप्शनवर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

(Har Ghar Tiranga Abhiyan 2023 In Marathi) हर घर तिरंगा अभियानात सहभागी होऊन, आपण भारताला एक मजबूत आणि समृद्ध देश बनवू शकता. वरील सर्व माहिती आवडली असेल तर कॉमेंट मध्ये उत्तर पाठवा आणि आपल्या सर्व मित्रांना पाठवा.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?