Mahila Sashaktikaran Yojana महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2024 Update: महिलांच्या प्रगतीचा मार्ग नवा.

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान 2023 | महाराष्ट्र महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023 | महाराष्ट्र सरकारी योजना | सरकारी योजना 2023 | Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana 2023 | महाराष्ट्र महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2023.Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Scheme 2023 for Women Empowerment in Maharashtra. या लेखात महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना काय आहे ? या यायोजनेचे फायदे काय आहेत ? या सर्व प्रश्नाचे उत्तर या लेखात पाहणार आहोत ..

महिला सशक्तीकरण :- Mahila Sashaktikaran Yojana मानव समाजात स्त्री जातीचा जवळपास अर्धा हिस्सा आहे, मानव समाजात महिलांना नेहमीच हतोत्साहित करून त्यांच्या कडे दुर्लक्ष केल्याजाते, तसेच त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे सुद्धा दुर्लक्ष केल्याजाते समाजात महिलांचा छळ सुद्धा केल्याजातो, अशी अनेक प्रकारची हीनत्वाची आणि भेदभावाची वागणूक महिलांना मिळत राहिली आहे. समाजातील हा भेदभाव दूर करून महिलांच्या प्रगतीसाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, समाजामध्ये अजूनही स्त्रिया निर्धन आणि निरक्षर असण्याचे मोठे प्रमाण आहे, विशेषत ग्रामीण ग्रामीणभागात हे प्रमाण जास्त प्रमाणात आहे तसेच ग्रामीण भागांमध्ये अजूनही महिला स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, स्त्रियांची निर्णय क्षमता वाढविणे आवश्यक आहे.

[table id=7 /]

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना (MMSY) माहिती-

भारतीय घटनेने स्त्रियांना अनेक अधिकार दिलेले आहे. महाराष्ट्र शासन नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत असते, हा सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून महाराष्ट्र शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच विविध मार्गाने त्यांची मदत करत असते, ग्रामीण महाराष्ट्रातील महिलांचे सशक्तिकरण करण्याच्या उद्देशाने शासनाने महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना 2022  (Mahila Sashaktikaran Yojana).

राज्यामध्ये राबविण्याचे ठरविले आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान या योजने बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

आज आमच्यापैकी अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांची बातमीही वर्तमानपत्रात झळकत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. असे का? जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? आत्मविश्लेषण केल्यास ही जबाबदारी आपली आहे, याची जाणीवही आपल्याला होईल. त्यांच्या मागासण्याचं कारण
आम्ही काही अंशी आहोतच.

आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकार करणार आहे, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याचा ग्रामीण विकास विभाग नोडल संस्था असेल, तसेच इतर सरकारी विभागांचाही यात सहभाग असेल, या योजनेंतर्गत महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे असलेल्या कुटुंबाच्या अधिकृत जमिनीच्या रेकॉर्डवर तसेच 7/12 च्या उताऱ्यावर पतीच्या नावाबरोबर त्यांचेही नाव लावण्यास शासन प्रोत्साहन देणार आहे त्याचप्रमाणे घराच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सुद्धा पत्नीच्या नावाचा समावेश करण्यासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे.

महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना (Mahila Sashaktikaran Yojana) काय आहे ?

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana महाराष्ट्र शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीचा सकारत्मक धोरण अवलंबून विविध प्रकारच्या योजना महिलांच्या कल्याणासाठी राबवीत असते, या धोरणांतर्गत प्रमुख्याने महिलांविषयी हिंसा, महिलांविषयक कायदे तसेच महिलांच्या आर्थिक व सामाजिक दर्जात सुधारणा यामध्ये असलेली प्रसारमाध्यमांची भूमिका आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, त्याचप्रमाणे महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजनांची निर्मिती आणि अंमलबजावणी, स्वयंसहायता बचतगटांचा विकास, मुद्रा योजना यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तसेच शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांमध्ये महिलांना नोकरीत आरक्षण मिळते आणि तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीत आरक्षण मिळते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यामतून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील.

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना संपूर्ण माहिती मराठी

जननी सुरक्षा योजना 

Mahila Sashaktikaran Yojana  2023 Features महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना वैशिष्ट्ये –

भारतातील बहुसंख्य महिला या घरकामात गुंतलेल्या असतात तसेच कमी उत्पादकतेची आणि कमी कौशल्याची कामे महिलांकडे दिली जातात म्हणून आर्थिक क्षेत्रात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते त्यामुळे महिलांचे आर्थिकदृष्ट्या सशक्तिकरण होण्याचे प्रमाण कमी आहे. महिला सक्षमीकरण  (Women Empowerment ) म्हणजे कायदे आणि कल्याण कार्यक्रमांच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक, शैक्षणिक व राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे त्याचबरोबर विकासासठी संधी उपलब्ध करून देणे तसेच स्त्री पुरुष असमानता नष्ट करणे.

 • महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरु होणार आहे.
 • राज्य सरकार महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शाश्वत बाजारपेठ आणि प्रभावी ब्राँडिंग साधने उपलब्ध करून देईल.
 • महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत स्वयं-सहायता गट (SHGs) ग्रामीण महिलांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करतील.
 • या योजनेच्या अंतर्गत प्रदर्शने, विशेष महिला मार्ट उभारण्यात येणार असून लाभार्थ्यांना कमी व्याजाच्या कर्जासह आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
 • महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना अंतर्गत ग्रामीण महिला उद्योजकांना मोफत कायदेशीर सल्लाही दिला जाणार आहे.
 • महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच योजनेचे मूल्यमापन, सनियंत्रण होण्याच्या दृष्टीने राज्य, जिल्हा, विभाग, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
 • या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हे, तालुका, इत्यादी विविध घटकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
 • ग्रामपंचायत महिला सदस्यांना पंचायतराज विषयक प्रशिक्षण देण्यात येईल.
 • अस्मिता योजनेंतर्गत सॅनिटरी नॅपकीनची उपलब्धता आणि विक्रीस चालना देण्यात येईल.
 • या योजनेमध्ये गावपातळीवर महिला संघटना आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सदस्यांचाही यात सहभाग असेल.
 • या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या स्वास्थ्य आणि विमा योजनांमध्ये महिलांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कार्यक्रम घेतले जाणार आहे.
 • योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेल्या महिला लाभार्थींसाठी घरकुलामध्ये प्रवेश करण्यासाठी गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, तसेच घरकुल मंजूर झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भूमिपूजन करून बांधकाम सुरु करण्यात येत आहे.
 • त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्या ग्रामपंचायत मधील महिला सदस्यांना पंचायतराज विषयक विविध प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येणार आहे.

महिलांच्या सशक्तिकरण ची संकल्पना स्वीकारल्यास आणि त्याचबरोबर सक्षमीकरणाच्या धोरणांची अंमलबजावणीचा फायदा संपूर्ण राष्ट्र, समुदाय आणि गटांना होऊ शकतो, तसेच समाजाच्या विकासासाठी महिलांचे सशक्तिकरण होणे आवश्यक आहे, कारण यामुळे विकासासाठी उपलब्ध असलेल्या मानवी संसाधनांचे गुणवत्ता वाढते.

 

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana
Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana

 

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana  2023 (Objectives) महासमृद्धी महिला सक्षमीकरण योजना उद्दिष्टे –

महाराष्ट्र शासनाकडून महिलांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या योजना सातत्याने आणि योजनाबद्ध पद्धतीने राबविल्या जात आहेत, या योजनांच्या अंतर्गत महिलांचे कल्याण आणि सुरक्षा करण्याचा शासनाचा उद्देश असतो, त्याचप्रमाणे महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वबळावर उभे राहिले पाहिजे या उद्देशासाठी शासन नेहमी मदत करत असते. तसेच जिद्द, मेहनत आणि धाडस या बळावर उद्योग व्यवसायातून महिलांना यशस्वीपणे समृद्धी खेचून आणता येते, यासाठी शासन मदत करण्यास सदैव तत्पर असते.

 1. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करणे.
 2. महिलांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्याचा विकास करण्यास मदत करणे.
 3. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी मदत करणे.
 4. उद्योजकता आणि व्यावसायिक गतीविधीमध्ये महिलांच्या सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी.
 5. महिलांच्या मालकीच्या व्यवसायांचा विकास करण्यासाठी आणि बाजारपेठेतील संबंध तसेच समर्थन प्रदान करण्यासाठी.
 6. प्रशिक्षण देऊन आणि संसाधने प्रदान करुन, ग्रामीण भागातील महिलांसाठी कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यास मदत करणे.
 7. महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवणे आणि महिलांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या सामाजिक नियमांना आव्हान देणे.
 8. महिलांना त्यांच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहन देणारी सर्वसमावेशक आणि सहाय्यक परिसंस्था (Ecosystem) निर्माण करणे.
 9. महिलांना त्यांचे उद्योजकीय कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय विकास सेवा प्रदान करणे.
 10. महिलांना उद्योगामध्ये मार्केटींग करता यावी, त्यासाठी नेटवर्क वाढविता यावे, यासाठी मदत करणे.
 11. त्याचप्रमाणे या योजने अंतर्गत महिलांमध्ये तंबाखूमुक्ती, तपकिरी मुक्ती, मशेरी मुक्ती, आदींबाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे.
 12. या अभियानाच्या काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहचवून महिलांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे, तसेच महिलांचे उपजीविकेचे स्त्रोत वाढविणे.
 13. या योजनेच्या अंतर्गत महिला बचतगटांना प्रदर्शने, कॉप शॉप तसेच सहकारी आणि कॉर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देणे.
 14. तसेच या योजने अंतर्गत बचतगट, ग्रामसंघ आणि प्रभागसंघाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षम संस्था निर्माण करण्यात येतील.
 15. महिलांच्या उपजीविकेचे स्त्रोत वाढविण्यासाठी निधी आणि कर्ज उपलब्धतेसाठी मदत करण्यात येईल.
 16. या योजनेंतर्गत शासकीय कार्यालयांच्या आवारामधील उपहारगृहे बचतगटांना चालविण्यासाठी देणे, त्याचबरोबर बचतगटांना उद्योग आणि खाद्य परवाना मिळवून देणे इत्यादीसाठी प्रयत्न केला जाईल.
 17. तसेच या योजने अंतर्गत महिलांना कायदेविषयक आणि कौटुंबिक हिंसाचार या विषयक कायद्यांबाबत मार्गदर्शन करणे आणि मोफत सल्ला देणे.
 18. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारणे त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 मराठी

 

Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana

 

महासमृद्धी महिला सक्षमीकरण (Mahasamruddhi Mahila Sashaktikaran Yojana) योजनेचे फायदे काय?

 1. विविध उद्योगांमध्ये महिलांसाठी कौशल्य विकासाच्या संधी वाढवल्या जात आहे.
 2. व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे महिलां मधील रोजगार क्षमता वाढवणे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी मदत.
 3. महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी अनुदानित कर्ज आणि आर्थिक सहाय्य  उपलब्ध करुन दिल्या जाते.
 4. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये मदत होते.
 5. महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारपेठेतील संबंध आणि उद्योजकीय समर्थन मिळवून देण्यास.
 6. प्रशिक्षण आणि संसाधनांची सोय उपलब्ध करुन देत, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवणे.
 7. आधुनिक शेती तंत्र आणि उपकरणे उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते.
 8. लिंग समानतेला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक निकषांना आव्हान देणारे जनजागृती अभियान आणि कार्यशाळा घेतल्या जाते.
 9. महिलांचे उद्योजकीय कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आणि व्यवसाय विकास कार्यक्रम घेतल्या जाते.
 10. महिलांना त्यांच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्यास आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रोत्साहन देणारी एक आश्वासक परिसंस्थेची निर्मिती केल्या जाते.

आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

 1. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील महिलांचे सक्षमीकरण करणे.
 2. महिलांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे आर्थिक स्वातंत्र्याचा विकास करण्यास मदत करणे.
 3. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी मदत करणे.
 4. उद्योजकता आणि व्यावसायिक गतीविधीमध्ये महिलांच्या सहभागाला आणि नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी.

 1. महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना समर्थन देण्यासाठी अनुदानित कर्ज आणि आर्थिक सहाय्य  उपलब्ध करुन दिल्या जाते.
 2. महिला उद्योजकांसाठी क्रेडिट आणि वित्तीय सेवांमध्ये मदत होते.
 3. महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बाजारपेठेतील संबंध आणि उद्योजकीय समर्थन मिळवून देण्यास.
 4. प्रशिक्षण आणि संसाधनांची सोय उपलब्ध करुन देत, महिला शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढवणे.
 5. आधुनिक शेती तंत्र आणि उपकरणे उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?