Pik Vima 2023-24: पीक विमा आता फक्त १ रुपयाला आताच ऑनलाईन अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.

पीक विमा योजना आता फक्त १ रुपयाला ऑनलाईन अर्ज करा | Pik Vima Yojana 1 Rupyala Apply Online 2023 |कागतपत्रे,लाभ,यादी Apply Online , Benifits, Documents शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही पीक विमा महत्त्वाचा आहे.

आज आपण शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 rupyala Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

प्रधानमंत्री फसल विमा योजना ही पीक दरम्यान नैसर्गिक अपघातांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोदी सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. 19 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते सुरू करण्यात आले.

फक्त १ रुपयाला पीक विमा (Pik Vima Yojana 1 Rupaya ) पाहा सविस्तर माहिती:-

राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना ( Pik Vima Yojana 1 Rupyala 2023) राबविण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (1) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. 13.1.10 अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान 1 रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल. तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. 1 रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याकरीता वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतक-यांना केवळ रु.1 रुपया /- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. 30-05-2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26  या  तीन वर्षाच्या  कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल.

विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबविण्यात येईल.योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.

1 Rupayala Pik Vima Yojana 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे.राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.

विहीर अनुदान योजना 2023 अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती मराठी

 

फक्त १ रुपयाला पीक विमा या योजनेचा मुख्य हेतू काय आहे ?

  • राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.
  • नैसर्गिक आपत्ती , कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा सरंक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

 

फक्त १ रुपयाला पीक विमा योजनेचे उद्दिष्ट्ये ( Pik Vima Yojana 1 Rupyala Objectives):-

  • शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतीमध्ये रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सरुवात करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या लेखात शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (Pik Vima Yojana 1 Rupayala 2023 ) या योजनेबद्दल ची माहिती हि अगदी सोप्या पद्धतीने दिली आहे जसे कि , त्या चा हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी , आम्हाला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल व तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल .

1 thought on “Pik Vima 2023-24: पीक विमा आता फक्त १ रुपयाला आताच ऑनलाईन अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.”

  1. फक्त एक रुपया मध्ये पिक विमा मला विश्वास वाटत नाही .
    मला ही माहिती मिळाली धन्यवाद .

    Reply

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?