कुक्कुटपालनाचे फायदे आणि कोंबड्यांच्या देशी विदेशी जाती | Poultry Farming Benifits , Breeds of Chickens Latest 2023

Poultry Farming Benifits | Breeds of Chickens  कुक्कुटपालन हा व्यवसाय करणारे लोक आज भरपूर प्रमाणात आहेत. कारण यामुळे आपल्या पैसा तर मिळतोच त्याचबरोबर आपल्याला एक उत्तम प्रकारचे खत सुद्धा मिळते. अंडी आणि मांस यांच्या उत्पादनासाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय जगात सर्वत्र केला जातो. कुक्कुटपालन ही कृषिव्यवसायाची एक महत्त्वाची शाखा मानण्यात आली आहे . संपूर्ण जगात बऱ्याच ठिकाणी जोडधंदा म्हणून शेतकरी कोंबड्या पाळतात व स्थानिक बाजारात अंडी व पिले यांची विक्री करतात. तथापि अलीकडच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिक संस्था अस्तित्वात आलेल्या असून त्यांच्यामार्फत बऱ्याच दूरवर अंडी व मांस यांचे वितरण करण्यात येते.

प्रगत देशांत अंड्यांचे व मांसाचे उत्पादन करण्याचे तंत्र मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात आले असून ही उत्पादने वेगवेगळीच करण्याची प्रथा पडत चालली आहे. पाश्चात्त्य देशांत कुक्कुटपालन (पोल्ट्री फार्मिंग) यात कोंबड्या बरोबरच टर्की, बदके, हंस (गूज) इ. पक्षीसुद्धा पाळायला सुरवात केली आहे. यापासून सुद्धा चांगली पैसे मिळवता येतो . कुक्कुटपालन हा व्यवसाय कसा करायचा आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी , रोग व यावर उपाय ,काळजी कशी घ्यावी ,लसीकरण कसे करावे आणि या व्यवसायापासून आपण किती भांडवल मिळवू शकतो, जाती आणि फायदे कोणकोणते आहेत या सर्व गोष्टी आपण या लेखात पाहणार आहोत .

कुक्कुटपालन म्हणजे काय ? What Is Poultry Farming in marathi:-

कुक्कुटपालन म्हणजे ज्यामध्ये आपण जमिनीवर कोंबडीपालन करतो. जेणेकरून आपण कोंबडीची अंडी आणि कोंबडी विकू शकू, यात आपल्याला फक्त कोंबडीची बाळं वाढवावी लागतील आणि त्यानंतर आपण कोंबडीची अंडी आणि कोंबडी बाजारात विकू शकतो.आणि त्यापासून खत सुद्धा मिळते याला कुक्कुटपालन असे म्हणतात .

कोंबडीच्या जाती (Chicken Breeds) :-

देशी जाती :-

 • कडकनाथ :- या जातीचे खरे नाव कालामाती म्हणजे काळी आतडी असणारी पक्षी असे आहे, परंतु कडकनाथ या नावाने प्रसिध्द आहे. मध्य प्रदेशातील मागासलेल्या भागात या जातीची मोठ्या प्रमाणात जोपासना केली जाते. ही कोंबडी फिकट असून तांबूस रंगाची आणि फारच कमी म्हणजे वार्षिक 80 अंडी घालते. हा पक्षी आकाराने लहान असून नराचे वजन दीड किलो तर मादीचे वजन एक किलो असते. यांच्या पिसांचा रंग पांढरा व सोनेरी असा मिश्र असतो. तर चामडी, चोच, पाय काळे असतात. ही कोंबडी आजाराला चांगली टक्कर देते.(Poultry Farming Benifits)
 • चितगाव :- ही कोंबडी भारताच्या पूर्व भागात आढळते. उंच व वजनदार असतो. चोचीपासून तळपयापर्यंत नराची उंच तर वजन साडेतीन चार किलो असते. तुरा वाटाण्यासारखा असून लालभडक असतो. डोके लांबट असनू चोच लांब व पिवळ्या रंगाची असते. अंगावरची पिसे शरीराला पखडून बसलेली असतात. त्यांचा रंग पांढरा, काळा, तपकिरी, राखी अशा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
 • बसरा :- लहान व मध्यम आकाराची ही कोंबडी महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवभर आढळते. शरीराची जडणघडण चांगली अंडी देणार्‍या कोंबडीसारखी असून शरीर खोलगट आहे. पिसांचा रंग फिकट असून ते विविध रंगामध्ये आढळतात. अंडी देण्याचे प्रमाण कमी असते. ही कोंबडी आजाराला लवकर बळी पडते. (Poultry Farming Benifits)
 • काश्मिरी :- ही कोंबडी काश्मिर प्रांतात मोठ्या प्रमाणावर आढळते. पिसांचा रंग तांबडा आणि काळा असून चोच व पाय पिवळे असतात. नराचा तुरा लहान असून तो ताठ असतो. गलोल लहान असते. मातीमध्ये तुर्‍याला बारीक-बारीक पिसे असतात. मादीची अंडे देण्याचे प्रमाण सर्वसाधारण असून तिचे वजन दोन किलो असते. नराचे वजन दोन ते अडीच किलो असते.
 • ब्रह्मा :- या जातीच्या कोंबड्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील भागात जास्त आढळतात, या जातीतील कोंबड्यांची शरीररचना खूप आकर्षक आहे ,अंगाने थोराड, रंगाने राखी वा काळी पिसे भरपूर असतात.
 • टेनिस नेकेड नेक :- या कोंबडीच्या गळ्याभोवती पिसे नसतात, म्हणून हिला नेकेड नेक असे नाव पडले. ही कोंबडी महाराष्ट्रात सर्वत्र सापडते. हिच्या आकार व रंगामध्ये विविधता आढळते. या जातीच्या नराचे वजन दोन किलो व मादीचे वजन दीड किलो असते.
 • पंजाब ब्राऊन :- ही कोंबडी मुख्यत्वेकरून पंजाब, हरियाना या राज्यात सापडते. पिसाचा रंग तपकिरी असतो तर चोच व पाय पिवळे असतात. या कोंडबीच मांस चविष्ट असल्यामुळे तिचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोंबडीपासून मिळणारी अंडी मध्यम आकाराची असून त्याचा रंग तपकिरी असतो. नराचे वजन तीन ते चार किलो असते तर मादीचे वजन दोन ते अडीच किलो असते.
 • गिरीराज :- कर्नाटकातील बंगलोर मधून ह्या जातीचा उगम झालेला आहे .गावरान कोंबडीसारखीच हि जात आहे ह्या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढते अणि एक अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन मिळते.
 • वनराज :- भारतात व महाराष्ट्रात सगळीकडेच हि जात आढळते ह्या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ होते अणि एका अंडी चक्रात 120 ते 160 अंडी उत्पादन मिळते .

भारतातील मशरूम शेती व्यवसाय

विदेशी जाती :-

 • व्हाईट लेगहार्न :- इटली या देशातील लेगहार्न खेड्यातून सर्वत्र पसरली. खाणे कमी व भारी वजनाची पांढरीशुभ्र अंडी या गुणामुळे व्यावसायिकांची आवडती बनली. ही कोंबडी दिसायाला पांढरीशुभ्र व तुरा एकेरी असून लालभडक असतो, नरामध्ये तो सरळ उभा असतो. नराचे वजन 2 ते 2.20 किलो असते तर मादीचे वजन 1 ते 1.5 किलो. वार्षिक अंडी देण्याचे प्रमाण 200 ते 250 असते.
 • ब्लॅक मिनोर्को :- ही कोंबडी एके काळी पांढरे शुभ्र मोठे अंडे घालण्यासाठी प्रसिध्द होती पण इतर जातींचा संकर केल्यामुळे हा गुण नाहीसा झाला. शरीराने व्हाईट लेगहार्नपेक्षा लहान असून सर्व पिसे काळीभोर असतात. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन 2 किलो तर मादीचे दीड किलो असते.
 • अंकोना :- ही जात इटलीतील अंकोना गावात लेगहार्न जातीपासून निर्माण झाली आहे. पिसाचा रंग राखी असून यावर पांढरे ठिपके असतात. नराची पिसे हिरवट चकचकीत काळी असतात.
 • ब्लॅक लेगहार्न :- मोठी अंडे देण्यात ही कोंबडी प्रसिध्द आहे. पाय, चोच व कातडी काळी असते. तुरा व गलोल मोठे असून अंड्यावरच्या कोंबडीमध्ये तुरा एका बाजूला कललेला असतो.
 • ब्राऊन लेगहार्न :- या कोंबडीची ठेवण, वजन आणि गुण जवळजवळ व्हाईट लेगहानरप्रमाणेच असतात पण दिसायला ही कोंबडी फारच आकर्षक असते. हिच्या पिसांचा रंग तपकिरी असतो. नरांचे शेपूट काळ्या रंगाच्या मिश्रणाने बनलेले असते. छाती आणि पोटाखालची काही पिसे काळी चकचकीत असतात.

मातीचे परीक्षण केल्याने शेतीत काय फायदे होतात जाणून घ्या ?

कुक्कुटपालन व्यवसायाचे फायदे (Poultry Farming Benifits):-

 • गाय, म्हैस इत्यादींपेक्षा कुक्कुटपालनास जागा,पाणी कमी लागते.(Poultry Farming Benifits)
 • गादी पद्धतीत प्रति पक्षास दोन ते अडीच चौरस फूट व पिंजरा पद्धतीत ६० ते ७५ चौ. इंच जागा लागते.
 • इतर व्यवसायापेक्षा उत्पन्न लवकर अंडी उत्पादन होते.
 • कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्याचे उत्पादन घेऊ शकतो.
 • कुक्कुटपालनाच्या व्यवसायात पैसे खेळता रायतो.
 • खूप कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळवू शकतो .(Poultry Farming Benifits)
 • कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्याच्या टाकाऊ पदार्थापासून उत्तम प्रकारचे खत मिळते.

आशा आहे कि आपल्याला कुक्कुटपालनाचे फायदे (Poultry Farming Benifits) व कोंबड्याच्या जाती बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती | Poultry Farming Business Plan in Marathi विषयी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

2 thoughts on “कुक्कुटपालनाचे फायदे आणि कोंबड्यांच्या देशी विदेशी जाती | Poultry Farming Benifits , Breeds of Chickens Latest 2023”

 1. आता आपल्याला सुध्दा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ‌.

  Reply

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?