कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती | Poultry Farming Business Plan in Marathi 2023

Poultry Farming Business in Marathi  कुक्कुटपालन हा पशुसंवर्धनाचा एक प्रकार आहे, यामध्ये कोंबडी, बदके, टर्की, हंस इत्यादी पाळीव पक्ष्यांना वाढवले जाते व त्यांचे मांस आणि अंडी यांचा खाण्यासाठी व बाजारात विक्री करून पैसे मिळवण्यासाठी हा व्यवसाय केला जातो. मुख्यतः कोंबडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. दरवर्षी 60 अब्जाहूनही अधिक कोंबड्यांचा खाण्यासाठी उपयोग केला जातो. अंडीसाठी वाढवलेल्या कोंबड्यांना थर म्हणून ओळखले जाते, तर मांसासाठी वाढवलेल्या कोंबडीला ब्रॉयलर असे म्हणतात.कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा ? रोगनियंत्रण,शेड कसा तयार करायचा ? याची सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत…

कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल थोडक्यात ओळख (Introduction):-

आपल्या भारत देशात कुक्कुट पालन व्यवसाय हा घरातील कोंबडीपालनातून वाढीस लागला आहे. काळाची गरज, मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार या व्यवसायाची गेल्या दोन दशकांमध्ये चांगलीच प्रगती झाली आहे. भारतामध्ये या व्यवसायात व्यापक प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी आहेत. आम्ही संपूर्ण kukut palan information in marathi मध्ये सादर करत आहोत. आपण आधुनिक व मूलभूत व्यवस्थापनाची जोड दिल्यास योग्य प्रकारे या व्यवसायामध्ये प्रगती करू शकतो.

भारतातील मशरूम शेती व्यवसाय : परिपूर्ण योजना | mushroom farming business in india : perfect plan 2023

कुक्कुटपालन व्यवसायासाठी जातिवंत कोंबड्यांची निवड (Poultry Farming Business ):-

देशी जाती :- कडकनाथ,चितगाव,बसरा,काश्मिरी,ब्रह्मा,पंजाब ब्राऊन,गिरीराज,वनराज.
विदेशी जाती :- व्हाईट लेगहार्न,ब्लॅक मिनोर्को,अंकोना,ब्लॅक लेगहार्न,ब्राऊन लेगहार्न.  कोंबडी पालन हे मांस आणि अंडी यासाठी केले जाते. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते. आणि लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात. तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळच्या पोल्ट्री फार्मला भेट द्या. यामध्ये तुम्ही जर 100 कोंबड्या पाळण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी जागा किती लागतो. कोंबड्याची पिल्ले कुठे उपलब्ध होतात, त्यांना खायला काय लागते, त्याची अंडी आणि कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर कुठे विकता येतील,या सर्व गोष्टीचा सर्वप्रथम नियोजन महत्वाचं आहे .

कुक्कुटपालनासाठी शेडची उभारणी कशी करायची :-

 • शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी. त्याचप्रमाणे जागेची निवड करताना तिच्या आकाराचा विचार करावा.
 • शेडसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. शेडची दिशा ही नेहमी पूर्व – पश्‍चिम असावी. शेड उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून शेड उभारावी.
 • सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फूट जागा मिळेल अशाप्रकारे शेड उभारावी. शेडची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो.
 • शेडचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. शेडची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी.
 • जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते. शेडला रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. शेडच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी.
Poultry Farming Business
Poultry Farming Business Shed
 • शेडमध्ये लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते.
 • दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने शेडमध्ये येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. शेडची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते. घराच्या छपराकरिता वापरण्यात येणारा पत्रा हा सिमेंटचा असावा.

लहान (Poultry Farming Business)पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी तुम्हाला 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. मध्यम पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी 1.5 लाख ते 3.5 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 7 लाख रुपये खर्च लागतो.

मातीचे परीक्षण केल्याने शेतीत काय फायदे होतात जाणून घ्या ?

कुक्कुटपालनाच्या पद्धती :-

गादी पद्धती :- (Poultry Farming Business) या पद्धतीमध्ये कोंबड्यांच्या घरातील जमीन फरसबंद असते, परंतु ती रोजच्या रोज साफ करण्याची पद्धत खर्चाची होते. त्याऐवजी व्यापारी पद्धतीने कोंबड्या पाळताना गादी पद्धतीचा वापर करतात. फरशीवर लाकडाचा भुसा, वाळलेले गवत, भाताचा भुसा, उसाच्या चोयट्यांचे तुकडे इ. पदार्थ पसरतात. ह्या वस्तू संपूर्णपणे कोरड्या असाव्या लागतात आणि त्यांचा थर १० ते १५ सेंमी. ठेवतात. वेळोवेळी ह्यावर भर टाकण्यात येते. मधूनमधून थरातील भुसा खालीवर चाळवतात, म्हणजे भुसा कोरडा राहतो. कालांतराने ६ ते ८ महिन्यांनी भुशात असणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे विष्ठा, भुसा आदी पदार्थांचा भुगा बनतो व मग त्यात बाष्प शोषून घेण्याची कुवत राहत नाही. अशा वेळी गादी बदलतात म्हणजे नवीन भुसा टाकतात. यात साफसफाईचा खर्च वाचून कोंबड्या सारख्या चाळवल्या जात नाहीत.

पिंजरा पद्धती :- (Poultry Farming Business) या पद्धतीमध्ये अंडी देण्याऱ्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये ठेवून पिंजऱ्यांच्या एकावर एक अशा ३ ते ४ रांगा घरात ठेवतात. यामध्ये जागेची बचत होते. भारतात ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास उन्हाळ्यात ही घरे थंड राखण्यासाठी छपरावर व घरात पाण्याचे फवारे उडवून तापमान कमी करणे जरूर असते. प्रत्येक पिंजऱ्याचा तळ जाळीचा असतो व त्याखाली असलेल्या तबकाच्या पत्र्यावर विष्ठा पडते. ही तबके साफ करावी लागतात. पाणी व खाद्य यांच्या पन्हाळी पिंजऱ्याच्या एका बाजूने जात असतात व त्यांतून पक्षी अन्नपाणी सहजपणे घेत असतो. ही पद्धत भारतात फारशी लोकप्रिय नाही. अलीकडे घरगुती प्रमाणावर कोंबड्या पाळणारे १० ते २० कोंबड्या राहतील अशी लोखंडाच्या चौकटीची घरे काही ठिकाणी वापरतात.

कोंबड्यांचे खाद्य :-

कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry Farming Business) करताना त्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास रोगाला प्रतिबंध करणे सोयीस्कर जाते. कोंबड्यांना सुरुवातीचे काही दिवस भरडलेला मका खाण्यास द्यावा. त्यानंतर पुढील चार आठवडे त्यांना स्टार्टर खाद्य द्यावे. त्यापुढील चार आठवडे फिनिशर खाद्य दिलं पाहिजे.

साधारणपणे कोंबडीचे एक पिल्लू आठ आठवड्याचे होईपर्यंत २.६ किलो खाद्याची गरज पडते. ब्रॉयलर (broiler) कोंबड्या या मांस उत्पादनासाठी पाळल्या जात असल्याने, जितकं जास्त वजन मिळेल, तितकं फायद्याचे ठरते.
पहिला पूर्ण आठवडा भरडलेला मका देत असताना, तिसऱ्या दिवसापासून स्टार्टर खाद्य देण्यास सुरुवात करावी. स्टार्टरचे (starter feed) प्रमाण प्रति पक्षी १० ग्रॅम याप्रमाणे द्यावे. दुसऱ्या आठवड्यात खाद्याचे प्रमाण वाढवून २० ग्रॅम प्रति पक्षी या प्रमाणात द्यावे. तिसऱ्या आठवड्यात ३० ग्रॅम प्रति पक्षी असे द्यावे. चौथ्या आठवड्यापर्यंत ४० ग्रॅमपर्यंत मात्रा वाढवत न्यावी. पाचव्या आठवड्यापासून प्रति पक्षी ५० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे. सहाव्या आठवड्यात फिनिशरचे (finisher) प्रमाण ६० ग्रॅमपर्यंत न्यावं. आठव्या आठवड्यात प्रति पक्षी ८० ग्रॅम फिनिशर खाद्य द्यावे.

पिल्ल्यांचे आरोग्य :-

 • कोंबड्यांचे लसीकरण तज्ञ्जांच्या सल्लाने करावे.
 • लस खरेदी करताना त्यावरील वापराची अंतिम तारीख तपासावी.
 • लस घेतेवेळी ती योग्य तापमानात ठेवल्याची खात्री करावी.
 • लसीच्या बाटल्यांची वाहतूक ही नेहमी थर्मासमध्ये बर्फ ठेवून त्यावरच करावी.
 • लसीकरण शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे. यामुळे कोंबड्यांवर वातावरण आणि लसीकरणाचा ताण पडणार नाही.
 • लसीच्या बाटलीसोबत आलेले निर्जंतुक पाणी हे लसीच्या बाटलीमध्ये टाकावे आणि ते एकजीव होईपर्यंत मिसळावे.
 • लसीकरणासाठी छोट्या आकाराच्या ड्रॉपरचा वापर करावा. ड्रॉपरची ने-आण करण्यासाठी बर्फाच्या पॅड वापरावे.
 • पक्षीगृहातील सर्व कोंबड्यांना एकाच वेळी लसीकरण करावे. फक्त निरोगी कोंबड्यांना लसीकरण करावे.
  एका वेळी एकच लस द्यावी. एकापेक्षा जास्त लसी दिल्यास कोंबड्यांमध्ये लसीची रिॲक्शन होऊन नुकसान होण्याची शक्यता असते.
 • वेळोवेळी पिण्याच्या पाण्यामध्ये जीवनसत्त्व व खनिज द्यावे. त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहते.
 • वापरात येणारी सर्व उपकरणे ४८ तासांसाठी २ टक्के सोडिअम-हायपोक्लोराइट द्रावणामध्ये बुडवून ठेवावे. आणि नंतर त्यांचा वापर करावा.
 • मेलेल्या कोंबड्या, त्यांचे मलमूत्र, खाली पडलेली पिसे लांब नेऊन जाळावीत. किंवा मृत कोंबड्या खोल खड्ड्यात चुना आणि मीठ टाकून पुरावे.
 • कुठल्याही रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा.
 • बाहेरून आणलेल्या नवीन कोंबड्या किमान ३० दिवस इतर कोंबड्यांपासून दूर ठेवाव्यात.
 • कोंबड्या खुराड्यात दाटीने ठेवू नये. भरपूर हवा व उजेड न मिळाल्यास कोंबड्या आजारी पडतात. खुराड्यात मोकळी जागा, हवा व उजेड असावा.
 • जीवाणूजन्य व विषाणूजन्य संक्रमित परिसरात विषाणूचे प्रमाण कमी होण्याकरिता २ टक्के सोडिअम हायपोक्लोराइट किंवा ४ टक्के फॉर्मलीन या जंतुनाशकाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा.

मत्स्यपालन व्यवसायाची माहिती

कोंबड्यांचे रोग :-

 1. मानमोडी – विषाणूमुळे होणारा जगभर दिसणारा भयानक सांसर्गिक रोग आहे
 2. मॅरेक्स रोग -हरपेझ  विषाणूमुळे (डीएनए प्रकार) कोंबड्यांना होणारा सांसर्गिक रोग. हा एक संहारक रोग आहे. परंतु ह्या रोगात दिसणारी लक्षणे श्वेत कोशिकाधिक्य ह्या रोगाशी इतकी मिळतीजुळती आहेत
 3. देवी – बोरिलिएटा एव्हियम नावाच्या विषाणूंनी होणारा संसर्गजन्य रोग आहे . या रोगाचा रोगप्रसार प्रत्यक्ष संसर्गामुळेच संभवतो. तसेच रोगी पक्ष्यांच्या रोगक्षतातून कृमिकीटकांद्वारे विषाणूंचा फैलाव निरोगी पक्ष्यांमध्ये होऊ शकतो
 4. प्लेग – विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग. रोगी पक्ष्याच्या सर्व उत्सर्गातून विषाणूंचा प्रसार होऊन रोग प्रसार होतो. स्रावदूषित अन्नामुळे जरी अत्यल्प प्रमाणात विषाणू पोटात गेले तरी रोग प्रादुर्भाव संभवतो. हा रोग सर्व जगभर आढळला आहे
 5.  बर्ड फ्लू – पक्ष्यांना देखील, माणसांप्रमाणेच, फ्लू होतो. बर्ड फ्लू, ज्याला एव्हीयन फ्लू, एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. H5N1 विषाणू पक्ष्यांना संक्रमित करतात, ज्यांमध्ये इतर पोल्ट्री आणि बदक इ. जंगली पक्ष्यांचा देखील समावेश आहे. तरीही, बर्ड फ्लू माणसाच्या आरोग्यास घातक ठरू शकतो.

सेंद्रिय शेतीचे मानवी जीवनातील महत्व काय

 लसीकरण :-

 1. (Poultry Farming Business) कुक्कुटपालन व्यवसायात (Poultry Farming Business) कोंबड्यांच्या खाद्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करणे गरजेचं ठरते. कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले (poultry chicks) शेडवर आणल्यानंतर त्यांच्यावर प्रवासाचा अतिरिक्त ताण येत असतो. हा ताण कमी करण्यासाठी त्यांना एक ग्रॅम इलेक्ट्रॉल पावडर (Electrol powder) एक लिटर पाण्यात टाकून द्यावी.
 2. दुसऱ्या दिवसापासून चौथ्या दिवसापर्यंत अॅन्टीबायोटीक एक ग्रॅम एक लिटर पाण्यातून द्यावी.
 3. पाचव्या ते सहावी दिवशी बी-कॉम्पलेस २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
 4. सातव्या दिवशी लासोटा लस, कोंबड्यांना एक थेंब डोळ्यात किंवा नाकातून द्यावी.
 5. त्यानंतर चौदाव्या व पंधराव्या दिवशी गंबोरा लस १ थेंब डोळ्यात किंवा नाकात द्यावी.
 6. पंचविसाव्या दिवसापासून तिसाव्या दिवसापर्यंत लिव्हर टॉनिक २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
 7. ४५ ते पन्नासाव्या दिवशी लिव्हर टॉनिक २० मिली प्रति १०० पक्ष्यांना द्यावी.
आशा आहे कि आपल्याला(Poultry Farming Business) कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा याची संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

 

 

3 thoughts on “कुक्कुटपालन व्यवसाय कसा करायचा संपूर्ण माहिती | Poultry Farming Business Plan in Marathi 2023”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?