PradhanMantri Ujjwala Yojana 2024: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना संपूर्ण माहिती मराठी : ऑनलाइन नोंदणी, पात्रता, नवीन लिस्ट, Ujjwala Yojana 2.0

PradhanMantri Ujjwala Yojana केंद्र सरकार आणि राज्य सरकारव्दारा देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात.

Table of Contents

विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच दारिद्य्ररेषेखालील लोकांसाठी विशेष प्रकारच्या योजना, त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, उंचावण्यासाठी या नागरिकांना अशा योजनांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा सरकार व्दारा उपलब्ध करून दिल्या जातात. यावेळी केंद्र शासनाने देशातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांसाठी विशेषतः ग्रामीण महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 , या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण देशात सुरु केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना  (PradhanMantri Ujjwala Yojana )केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

देशातील महिलांना अजूनही भोजन तयार करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना पारंपारिक पद्धतीचाच वापर करावा लागतो, यामध्ये लाकडे आणि शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या, वाळलेल्या झाडाच्या काड्या, वाळलेले गवत आणि कोळसा परंतु या सर्व वस्तूंपासून मोठ्याप्रमाणात धूर निर्माण होतो आणि या धुरामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे, तसेच या धुरामुळे वातावरण सुद्धा मोठ्याप्रमाणात दुषित होते. त्यामुळे ग्रामीण भागातील या गरीब कुटुंबातील महिलांसाठी उज्ज्वला योजना जीवनदायनी आणि मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. मित्रहो, या लेखात आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजने संबंधित संपूर्ण माहिती जसे कि योजनेला लागणारी पात्रता, या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया, या योजनेचा उद्देश काय आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत….

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी –

एलपीजी गॅसची उपलब्धता शहरी भागात किंवा मोठया शहरांमध्ये सहज आणि सुलभतेने दिसून येते परन्तु ग्रामीणभागात गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना एलपीजी गॅसची उपलब्धता मर्यादित प्रमाणात होत असते, त्यामुळे या गरीब कुटुंबाना स्वयंपाकासाठी इंधन म्हणून कोळसा आणि लाकडे वापरावी लागतात या इंधनांच्या वापराने होणाऱ्या धुराच्या प्रदूषणामुळे आरोग्या संबंधित गंभीर परिणाम दिसून येतात.

घरात कोंडलेल्या धुराच्या वायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या श्वसना संबंधित गंभीर आजार दिसून आले आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील महिलांना आणि मुलांना गंभीर आजारांपासून वाचविण्यासाठी तसेच यापासून होणारे वातावरण प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना (बीपीएल) एलपीजी कनेक्शन (स्वयंपाकाचा गॅस) या योजनेच्या माध्यमातून पुरविण्याचे ठरविले आहे. या योजनेच्या अंतर्गत पाच कोटी आर्थिकदृष्ट्या कमकुवत (बीपीएल) कुटुंबांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना योजनेच्या अंतर्गत प्रती कनेक्शन 1600/- रुपयांची आर्थिक सहाय्यता सुद्धा देण्यात येणार आहे.

PradhanMantri Ujjwala Yojana ) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023 वैशिष्ट्ये (Features)

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या PradhanMantri Ujjwala Yojana अंतर्गत पाच कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे, या योजनेमुळे ग्रामीण भागात भोजन बनविण्यासाठी पारंपारिक पद्धतीने वापरत येणाऱ्या इंधनामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम टाळता आला असून, या योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या केल्यामुळे योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण सुद्धा साध्य करण्यात आले.

 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील पाच कोटी परिवारांना एलपीजी गॅस कनेक्शन या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा सुरवातीचा संकल्प केंद्र शासनाने आता वाढवून आठ करोड बीपीएल कुटुंबांना या योजनेंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रत्येक एलपीजी कनेक्शनसाठी सोळाशे रुपयांच आर्थिक सहाय्य या योजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच योजनेची महत्वपूर्ण बाब म्हणजे योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे एलपीजी गॅस कनेक्शन कुटुंबातील महिलेच्या नावाने दिले जाणार आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना 14.2 किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे देशातील दुर्गम आणि डोंगराळ भागात 14.2 किलो वजनाचा सिलेंडर ट्रान्सपोर्ट करणे शक्य नसल्यामुळे शासनाकडून पाच किलो वजनाचे दोन एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे, योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना जवळच्या गॅस वितरण केंद्रावर जाऊन या योजनेंतर्गत गॅस कनेक्शनसाठी अर्ज करवयाचा आहे.
 • या योजनेमुळे ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने लाकडाच्या इंधनावर भोजन व्यवस्था करण्यासाठी होणारी जंगलतोड थांबून त्याव्दारे पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उद्देश साध्य होईल.
 • केंद सरकारने 2018-19 च्या अर्थसंकल्पात एलपीजी कनेक्शन वितरणाचे लक्ष आठ कोटी करण्यात आले होते, यासाठी 2019 पर्यंतचे पाच कोटी एलपीजी कनेक्शनचे लक्ष प्राप्त करण्यासाठी शासनाकडून 8000 कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर एलपीजी कनेक्शन वितरणाचे लक्ष आठ कोटी केल्यामुळे यासाठी 12800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
 • यानंतर केंद्र शासनाने 2021-22 च्या अर्थसंकल्पात एलपीजी गॅस कनेक्शन वितरणाचे लक्ष एक कोटीने वाढवून आता 9 कोटी एलपीजी कनेक्शन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे देशातील एलपीजी गॅस कनेक्शनचे कव्हरेज 1 मे 2016 मध्ये जे 62 टक्के होते ते 2021 मध्ये वाढून 99.8 टक्के वाढण्यास मदत झाली आहे.
 • पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी गस कनेक्शन वितरणासाठी आर्थिक, सामाजिक व जातीय जनगणना 2011 चा (SECC 2011) आधार घेण्यात आल्यामुळे या योजनेचा लाभ योग्यत्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. 

योजनेचे फायदे : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY)-

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेचे लक्ष्य लाभार्थ्यांसाठी अनेक फायदे आहेत, ज्यात हे समाविष्ट आहे:

सुधारित आरोग्य: लाकूड, कोळसा आणि शेण यासारख्या पारंपारिक इंधनाच्या वापरामुळे घरातील वायू प्रदूषण होते, जे आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोका आहे. स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन म्हणून एलपीजीचा वापर लक्ष्यित घरांमधील महिलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारले जाईल .

कमी कष्ट: ग्रामीण भागातील महिला स्वयंपाकासाठी सरपण आणि इतर पारंपारिक इंधने गोळा करण्यात बराच वेळ घालवतात. स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन म्हणून एलपीजीचा वापर केल्याने महिलांची कष्ट कमी होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.

सक्षमीकरण: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे उद्दिष्ट महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन स्त्रोत उपलब्ध करून देऊन सक्षम करणे आहे. ही योजना महिलांना निरोगी आणि अधिक उत्पादनक्षम जीवन जगण्यास सक्षम करेल.

पर्यावरणीय फायदे: लाकूड, कोळसा आणि शेण यासारख्या पारंपारिक इंधनांचा वापर जंगलतोड करण्यास कारणीभूत ठरतो, ज्यामुळे पर्यावरणावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात. स्वच्छ स्वयंपाक इंधन म्हणून एलपीजीचा वापर पारंपारिक इंधनावरील अवलंबित्व कमी करेल आणि पर्यावरणाचे समतोल राखले जाईल

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0  New अपडेट-

उज्ज्वला योजनेच्या लाक्षांमध्ये वाढ करून ते आठ करोड एलपीजी कनेक्शन करण्यात आले होते जे शासनाने 2019 मध्येचं पूर्ण करण्यात यश मिळवले. तसेच केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे उज्ज्वला योजना 2.0 च्या माध्यमातून एक कोटी लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शनचा लाभ मिळणार आहे, 2021-22 च्या अर्थसंकल्प जाहीर करतांना या संबंधित घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाचा उद्देश आहे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून एलपीजी गॅसची सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले वंचित आणि गरीब कुटुंबापर्यंत पोहोचावी यामुळे अनेक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ होतील, या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना अशुद्ध इंधन सोडून शुद्ध आणि सुरक्षित इंधन वापरण्याकडे प्रोत्साहित केले जात आहे.

 

PradhanMantri Ujjwala Yojana form
PradhanMantri Ujjwala Yojana form

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 latest अपडेट –

देशातील गरिबांसाठी आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2022 या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे, 10 ऑगस्ट 2021 रोजी देशाच्या माननीय प्रधानमंत्री यांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुरुवात केली आहे. डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शनसह उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत योजनेच्या लाभार्थ्यांना प्रथम सिलेंडर आणि हॉटप्लेट विनामुल्य प्रदान करण्यात येईल. तसेच योजनेंतर्गत नाव नोंदणीची पक्रियेसाठी कमीतकमी कागदपत्रांची आवश्यकता असेल, त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांना रेशनकार्ड किंवा पत्ता पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही. यासाठी फक्त स्व-घोषणापत्र देण्याची आवश्यकता आहे .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महाराष्ट्र –

भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जात आहे. या योजनेचा फायदा मोठया जनसमुहाला झाला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र चूलमुक्त धूरमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्र राज्यात उज्ज्वला गॅस योजना आणि एलपीजी गॅस वितरणाच्या अन्य योजनांच्या लाभापासून जी कुटुंबे वंचित राहिली आहे, अशा कुटुंबांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे.

राज्यात उज्ज्वला गॅस योजना शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे आणि आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मार्गदर्शक प्रकल्प म्हणून राबविण्यात येईल.केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे काम विभागामार्फत तेल कंपन्यांच्या सहकार्याने युद्धपातळीवर सुरु आहे, महाराष्ट्र राज्यात 2019 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2.0 अंतर्गत 40.63 लाख कुटुंबांनी गॅस कनेक्शनचा लाभ मिळविला आहे. परंतु अद्यापही काही कुटुंबे एलपीजी कनेक्शनच्या लाभापासून वंचित आहेत. यातील सर्व पात्र कुटुंबांना शोधून त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-2 मध्ये लाभ देण्यासाठी शासनाने उज्ज्वला योजना महाराष्ट्र सुरु करण्यात आली आहे

योजनेचे नावप्रधानमंत्री उज्ज्वला योजना
व्दारा सुरुकेंद्र सरकार
योजनेची सुरुवात1मे 2016
लाभार्थीग्रामीण गरीब परिवारातील महिला
उद्देश्यग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजीसारखे स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
आर्थिक सहाय्य1600/- रुपये /एलपीजी कनेक्शन
आधिकारिक वेबसाईटhttps://www.pmuy.gov.in/
विभागपेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन / ऑफलाईन

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत LPG कनेक्शन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती देशभरात यशस्वीपणे लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये खालील पायऱ्या आहेत:

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत एलपीजी कनेक्शन मिळावयाचे असल्यास आपण या योजनेंतर्गत ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने अर्ज करू शकतो, योजनेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज फॉर्म डाऊनलोड करावा लागेल किंवा जवळच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये जाऊन योजनेचा अर्ज मिळू शकतो.

उज्ज्वला योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबातील कोणतीही पात्र महिला एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करू शकते यासाठी उज्ज्वला योजनेचा अर्ज मिळवून, अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसेकि आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता, नाव, जन धन योजनेतील बँक खाते नंबर इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी, यानंतर योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून एलपीजी वितरण केंद्रामध्ये जाऊन जमा करावा.

अर्ज करतांना आपल्याला सिलेंडरच्या वजनाची निवड करावी लागेल (14.2 किलो किंवा 5 किलो) तसेच यासाठी आपल्याला KYC फॉर्म भरणे आवश्यक आहे. त्यानंतर एलपीजी केंद्र अधिकाऱ्याकडून अर्ज आणि कागदपत्रांची संपूर्ण पडताळणी आणि प्रमाणित करण्यात येते. हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थ्यांना दहा ते पंधरा दिवसाच्या आत एलपीजी कनेक्शन जारी केले जाईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी 

उज्ज्वला योजना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया  –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रियेचे अनुसरण करून योजनेंतर्गत अर्ज करू शकता.

 • यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ उघडेल, या होम पेजवर तुम्हला ‘’PMUY कनेक्शनसाठी अर्ज करा’’ हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर तुमच्यासमोर एक बॉक्स उघडेल ज्यामध्ये तीन एलपीजी वितरकांचा पर्याय असेल उदाः इंडेन गॅस, भारत गॅस आणि HP गॅस या तीन एलपीजी वितरण कंपन्यांमधून तुम्हाला एकाची निवड करावी लागेल. त्या पर्यायावर क्लिक करा.
 • वितरण कंपनी निवडल्यावर ‘’अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा’’ या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला ‘’उज्ज्वलालाभार्थी कनेक्शन’’या विकाल्पावर टिक करावी लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला एलपीजी वितरकाची निवड करावी लागेल ( राज्य, जिल्हा, वितरक)
 • यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना eKYC अर्ज पाहायला मिळेल यामध्ये तुम्हाला योग्य पर्यायांवर टिक करावी लागेल.
 • यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि ‘’OTP जनरेट करा’’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • आता पुढे तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल उदाः तुमचा तपशील, रेशनकार्ड तपशील, संपर्क माहिती, बँक खात्याचे तपशील, इत्यादी माहिती प्रविष्ट करावी लागेल
 • यानंतर तुम्हाला एलपीजी कनेक्शन तपशील निवड करावी लागेल (14.2 किलो / 5 किलो) आणि तुम्हाला आवश्यक वजनाचा एलपीजी सिलेंडर निवडावा लागेल.
 • अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर सबमिट बटनावर क्लिक करा. या पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकता. योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल (Application Id) तो नोट करून ठेवणे आवश्यक आहे

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती

उज्ज्वला योजना KYC फॉर्म डाऊनलोड कसे करायचे . –

उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी कनेक्शन मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करतांना KYC करणे आवश्यक आहे, KYC फॉर्म पुढीलप्रमाणे वेबसाईटवरून डाऊनलोड करावा.

 • अर्जदाराला सर्वप्रथम उज्ज्वला योजनेच्याअधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल,
 • या होम पेजवर तुम्हाला फॉर्म या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे पर्याय दिसून येतील
 • तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार फॉर्म निवडून त्यावर क्लिक करावे लागेल
 • आता तुमच्यासमोर फॉर्मचे PDF येईल, फॉर्म PDF डाउनलोड करण्यासाठी डाऊनलोड या पर्यायवर क्लिक करावे लागेल.
 • या प्रकारे तुम्ही हे आवश्यक फॉर्म पीडीएफ डाऊनलोड करू शकता, हि आवश्यक कागदपत्र ऑफलाईन अर्जासाठी आणि जवळच्या एलपीजी वितरण केंद्रामध्ये जमा करण्यासाठी वापरले जातात.

एलपीजी (LPG) वितरक बदलविण्यासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे. –

ग्राहकांना सुधारित आणि चांगली सेवा मिळावी म्हणून आणि वितरकांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करण्यासाठी यासाठी ग्राहकांना समान पत्त्यावर सेवा देणाऱ्या वितरकांमधून वितरक निवडण्यासाठी ग्राहकांना सक्षम करण्यासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक त्याच्या वितरकाच्या सेवांबाबत समाधानी नसला तर ग्राहक पोर्टेबिलिटी पर्यायाचा वापर करून वितरक बदलू शकतो. यासाठी ग्राहकाला पुढीलप्रमाणे पोर्टेबिलिटीसाठी नोंदणी करावी लागेल.

सर्वप्रथम ग्राहकाला OMC च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुमची आधी वेबसाईटवर नोंदणी नसेल तर प्रथम वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल
यानंतर तुम्हाला वितरकांची यादी पाहून त्यांच्या सेवांची आणि रिफील वितरण कामगिरी संबंधित माहिती मिळवावी लागेल. त्यांचे स्टार रेटिंग पाहावे लागेल.
त्यानंतर वितरकांच्या यादीमधून तुमच्या आवडीचे वितरक निवडा.
यानंतर ग्राहकाला पोर्टेबिलिटी विनंती आणि स्टेटस अपडेटची पुष्टी करणारा ई-मेल प्राप्त होईल
पोर्टेबिलिटी विनंतीच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड डिजिटली हस्तांतरित केले जातात
पोर्टेबिलिटी योजनेंतर्गत कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही हस्तांतरण शुल्क किंवा अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जात नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PradhanMantri Ujjwala Yojana)

आवश्यक कागतपत्रे- 

उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी केवळ एक अर्ज आपल्या जवळच्या एलपीजी वितरण केंद्रावर जाऊन सादर करावयाचा आहे, या एलपीजी वितरण केंद्रावर अर्ज फॉर्म विनामुल्य मिळतो किंवा या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज भारता येतो. अर्ज सादर करतांना अर्जदाराला खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता भासेल.

 • आधार कार्ड क्रमांक ( ओळखीचा पुरावा म्हणून अर्दाराचे आधार कार्ड)
 • जन-धन बँक खात्याचे नंबर
 • पंचायत अधिकारी / नगपालिका यांनी प्रमाणित केलेले बीपीएल प्रमाणपत्र
 • बीपीएल रेशनकार्ड (ज्या राज्यातून अर्ज केला जात आहे त्या राज्याने जारी केलेले रेशनकार्ड)
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • कुटुंबातील सदस्यांचा आधार क्रमांक
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • जाती प्रमाणपत्र
 • कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक KYC

 

अधिकृत वेबसाईटClick Here येथे क्लिक करा
PMUY अर्ज PDF डाउनलोडClick Here  येथे क्लिक करा
PMUY KYC फॉर्म डाउनलोडClick Here  येथे क्लिक करा
उज्ज्वला योजना हेल्पलाईन नंबर1800-233-3555
टोल-फ्री नंबर1800-266-6696

उद्दिष्टे: PMUY योजनेची अनेक उद्दिष्टे आहेत ,खालीलप्रमाणे :-

 • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधन पुरवणे.
 • बायोमास आणि कोळसा वापरून पारंपारिक स्टोव्हवर स्वयंपाक करण्याशी संबंधित आरोग्य धोके कमी करण्यासाठी.
 • महिलांना कार्यक्षम आणि स्वच्छ स्वयंपाक इंधन पर्याय उपलब्ध करून त्यांना सक्षम करणे.
 • घरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी.
 • स्वयंपाक करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत कमी करण्यासाठी.
 • महिला आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी.

लक्ष्य लाभार्थी: PMUY योजना बीपीएल कुटुंबातील महिलांसाठी लक्ष्यित आहे ज्यांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध नाही. सामाजिक-आर्थिक जात जनगणना (SECC) 2011 डेटाच्या आधारे योजनेसाठी लक्ष्यित लाभार्थी ओळखले जातात. ही योजना ओळखल्या गेलेल्या लाभार्थ्यांना प्रति एलपीजी कनेक्शन 1,600 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. ही योजना स्टोव्ह खरेदी करण्यासाठी आणि पहिले रिफिल करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देखील प्रदान करते.

अंमलबजावणी: PMUY योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे लागू केली जाते. देशभरातील एलपीजी वितरकांच्या नेटवर्कद्वारे ही योजना लागू केली जाते. पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना एलपीजी कनेक्शन आणि स्टोव्ह देण्याची जबाबदारी वितरकांवर असते. कनेक्शन प्रदान केल्यापासून तीन महिन्यांच्या आत लाभार्थींना पहिले रिफिल मिळेल याची खात्री करण्याची जबाबदारी वितरकांवर आहे.

या योजनेत स्टोव्ह खरेदी करण्यासाठी आणि पहिल्या रिफिलसाठी लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी 2,000 कोटी रुपयांचा कॉर्पस फंड तयार करण्याची तरतूद आहे. हे कर्ज व्याजमुक्त आहे आणि दहा महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा रु. 150 च्या हप्त्यांमध्ये फेडायचे आहे.

प्रगती: PMUY योजना मे 2016 मध्ये लाँच झाल्यापासून खूप यशस्वी झाली आहे. फेब्रुवारी 2022 पर्यंत, योजनेने देशभरातील BPL कुटुंबातील महिलांना 9 कोटींहून अधिक LPG कनेक्शन प्रदान केले आहेत. भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेचा महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्षणीय परिणाम झाला आहे. स्वयंपाकाचे इंधन म्हणून एलपीजीचा वापर केल्याने महिला आणि मुलांचा घरातील वायू प्रदूषणाचा धोका कमी झाला आहे, जो आरोग्यासाठी एक मोठा धोका आहे. एलपीजीच्या वापरामुळे स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि मेहनतही कमी झाली आहे, ज्यामुळे महिलांना शिक्षण आणि उदरनिर्वाह यांसारख्या इतर कामांवर अधिक वेळ घालवता आला आहे.

या योजनेचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम झाला आहे. स्वयंपाकाचे इंधन म्हणून एलपीजीच्या वापरामुळे बायोमास आणि कोळशाचा वापर कमी झाला आहे, ज्यामुळे जंगलतोड कमी होण्यास आणि हवामानातील बदल कमी करण्यात मदत झाली आहे.

निष्कर्ष:-

PMUY योजना ही BPL कुटुंबातील महिलांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन पुरवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची सामाजिक कल्याणकारी योजना आहे. मे 2016 मध्ये लाँच झाल्यापासून ही योजना खूप यशस्वी झाली आहे आणि तिने देशभरातील महिलांना 9 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन प्रदान केले आहेत. या योजनेचा महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्षणीय परिणाम झाला आहे आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम झाला आहे. ही योजना सर्वांसाठी स्वच्छ ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे आणि देशाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे योगदान आहे.आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

नाही, ही योजना फक्त BPL/गरीब घरातील महिलांसाठी आहे.

एक प्रौढ महिला गरीब घरातील आहे , आणि तिच्याकडे एलपीजी कनेक्शन नाही.

होय, परंतु तुम्ही परिशिष्ट 1  (Annexure 1 ) भरा आणि अर्ज प्रक्रियेदरम्यान अपलोड करा.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?