सेंद्रिय शेतीचे मानवी जीवनातील महत्व काय ? | Sendriya Shetiche Mahtav future Farming In Marathi 2023 | Organic Farming

Sendriya Shetiche Mahtav In Marathi | Organic Farming | Organic farming In marathi | sendriya shetiche fayde | shendriya sheti ksi krave | शेतकरी बांधवानो आपण आपल्या शेतामध्ये दरवर्षी अनेक पिकाची लागवड करत असतो तर त्या पिकाच्या लागवडीसाठी व वाढीसाठी अनेक प्रकारची आपण खते किंवा रासायनिक औषधे वापरत असतो , विषारी भाजीपाला अन्नधान्य पासून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे . यामुळे पर्यावणात खूप मोठा वाईट परिणाम झाला आहे.

पर्यावणासोबतच मानवी आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे . आपले आयुष्य फार कमी झाले , मानवच जीवनकाल खूप वर्षांन कमी झाला आहे . नवनवीन रोगाची निर्मिती होत आहे यामुळे आपल्याला शेतीत बदल घडवून आणायला पाहिजे , सेंद्रिय शेतीचा अवलंब करायला पाहिजे. या लेखात आपण सेंद्रिय शेती (Sendriya Sheti) कशी करावी या बद्दल पाहूया ..

सेंद्रिय शेती म्हणजे काय (Sendriya Sheti manje kay ) ?

सेंद्रिय शेती (Sendriya Sheti) म्हणजे कृषी उत्पादनाची एक पद्धत जी पिके वाढवण्यासाठी आणि पशुधन वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल पद्धतींचा वापर करण्यावर भर देते. पर्यावरणीय समतोल आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देताना रासायनिक खते, कीटकनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) यांसारख्या कृत्रिम निविष्ठांचा वापर कमी करणे किंवा अजिबात वापर करू नये यालाच सेंद्रिय शेती असे म्हणतात .

सेंद्रिय शेतीची प्रमुख तत्त्वे (Principles of Sendriya Sheti ):-

 • मातीचे आरोग्य :- सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही महत्वाच्या बाबी लक्ष्यात घ्यावे लागेल जसे – पिकाची फेरपालट, कंपोस्टिंग आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर यांसारख्या पद्धतींद्वारे मातीची सुपीकता योग्य ठेवता येते . शक्यतो कृत्रिम खतांचा वापर टाळवा , आणि पोषक तत्वांच्या नैसर्गिक स्रोतांचा जास्त प्रमाणावर वापर करावा .यामुळे मातीचे आरोग्य चांगले राखता येईल.
 • कीड आणि तण व्यवस्थापन :-  कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) तंत्राचा वापर करणे खूप गरजेचे आहे . यामध्ये कीटकांची संख्या कमी करण्यासाठी जैविक नियंत्रणे, पीक फिरवणे, फायदेशीर कीटक आणि इतर पद्धतींचा वापर करणे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत . त्याचप्रमाणे, मल्चिंग, हाताने तण काढणे आणि यांत्रिक मशागत यासारख्या पद्धतींद्वारे तणांचे व्यवस्थापन करावे .
 • जैवविविधता संवर्धन :- सेंद्रिय शेतीमुळे शेतातील जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यास प्रोत्साहन मिळते. शेतकरी विविध पिकांच्या वाणांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत असतात, आणि परागकण आणि कीटकांचे नैसर्गिक भक्षक यासारख्या फायदेशीर जीवांसाठी निवासस्थान निर्माण करतात .
 • प्राणी कल्याण :- प्राण्यांना सेंद्रिय खाद्य खूप मोठा प्रमाणात मिळत असते, यामुळे जनावरांना चान्गले गुणधर्म युक्त चारा मिळत असतो .
 • कृत्रिम निविष्ठांवर प्रतिबंध :- सेंद्रिय शेतीमध्ये कृत्रिम कीटकनाशके, रासायनिक खते, जीएमओ आणि इतर कृत्रिम पदार्थांच्या वापरावर कठोरपणे प्रतिबंध असतो . त्याऐवजी, ते कंपोस्ट, खत, शेणखत , हिरवळीचे खत, कव्हर पिके आणि जैव कीटकनाशके यांसारख्या नैसर्गिक आणि सेंद्रिय निविष्ठांवर अवलंबून असते.

अटल पेंशन योजना माहिती मराठी

सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते ( Benifits of Sendriya Sheti ):-

पर्यावरणीय स्थिरता :- कृत्रिम निविष्ठांचा वापर कमी करून, सेंद्रिय शेतीमुळे माती, पाणी आणि हवेच्या गुणवत्तेवर होणारे संभाव्य नकारात्मक परिणाम कमी होतात. हे जैवविविधता संवर्धनास प्रोत्साहन देते आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.

निरोगी अन्न :- सेंद्रिय शेतीचे (Sendriya Sheti) उद्दिष्ट कृत्रिम कीटकनाशकांचे अवशेष आणि जीएमओपासून मुक्त असलेले अन्न तयार करणे आहे. बरेच ग्राहक सेंद्रिय उत्पादन निवडतात कारण त्यांना विश्वास आहे की ते निरोगी आणि अधिक पौष्टिक आहे.

मातीची सुपीकता :- सेंद्रिय शेती पद्धती दीर्घकाळासाठी मातीचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतात. सेंद्रिय पदार्थ आणि नैसर्गिक खतांचा वापर करून, ते सुपीक आणि पोषक-समृद्ध मातीच्या विकासास प्रोत्साहन देत असते .

ग्रामीण समुदायांसाठी समर्थन :- सेंद्रिय शेती (Sendriya Sheti) अनेकदा स्थानिक आणि लहान-शेतीला प्रोत्साहन देते. हे शेतकर्‍यांना आर्थिक संधी प्रदान करू शकते आणि शाश्वत कृषी पद्धतींना चालना देऊन ग्रामीण समुदायांना आधार देते.

मालाला भाव :- सेंद्रिय शेतीमुळे जे आपण उत्पादन घेणार ते संपूर्णपणे ऑरगॅनिक उत्पादन असणार आहे त्यामुळे आपल्याला त्या उत्पादनाच्या मार्केटला भाव देखील जास्त मिळणार आहे.आपल्या मालाची वैशिष्ठ्य व गुणवत्ता हा चांगला असल्यामुळे मालाला मागणी सुद्धा खूप जास्त असणार आहे .

जननी सुरक्षा योजना (JSY) संपूर्ण माहिती मराठी 2023

सेंद्रिय शेतीचे उद्देश (Objectives):-

आजच्या घडीला तुम्ही पाहतच असाल की खूप सार्‍या शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस कुठे ना कुठेतरी एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे म्हणजेच की आपण पाहतच असाल की जर एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात एखादं दोन गोणी खत टाकलं, तर दुसरा शेतकरी ते पाहून त्याच्या शेतामध्ये चार गोणी खत टाकतो त्याला असे वाटते की त्याच्यापेक्षा जास्त खत जर मी माझ्या शेताला टाकले किंवा पिकाला टाकते तर माझं उत्पादन हे त्याच्यापेक्षा जास्त होईल, परंतु अशा गैरसमजामुळे शेतकरी हा त्याच्या उत्पादनाचं नुकसान करतच आहे.

परंतु त्यामध्ये त्याच्या शेतीच देखील नुकसान करत आहे असं कस काय तर शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण रासायनिक खतांचा व औषधांचा वापर गरजेपेक्षा जास्त आपल्या शेतामध्ये करतो तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम हा आपल्या जमिनीला होत असतो काही शेतकरी तर असे पाहायला मिळतात की जमिनीतील मातीची व पाण्याचे कृषी लॅब मध्ये तपासणी न करता दुसऱ्याचे पाहून आपल्या जमिनीला देखील खत देण्यास खूप प्रमाणात सुरुवात करतात.

ज्यामुळे कुठे ना कुठे भविष्यात त्यांना त्या खतासाठी जास्त पैसे मोजावे लागतात आणि त्यांना उत्पादन देखील कमी स्वरूपाच होत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने खतांचा वापर करण्याआधी आपल्या जमिनीमधील मातीची व पाण्याची टेस्ट ही कृषी लॅब मध्ये करून घ्यावी आणि त्यानंतरच आपल्या जमिनीत जे अवशेष कमी असतील त्यानुसार खतांच व्यवस्थापन कृषी अधिकाऱ्याच्या मदतीने करावे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 मराठी

सेंद्रिय शेती करण्याची पद्धत (Method ) :-

 • सेंद्रिय शेती ही नैसर्गिक खतांचा वापर करून केली जाते . म्हणजेच की या शेतीमध्ये आपण शेणखत,गांडूळखत,लेंडी खत, अशा असंख्य प्रकारच्या नैसर्गिक खतांचा वापर आपण करणार आहोत, परंतु हे खत आपल्याला आपल्या शेतामध्ये प्रति एकर तीन टनच्या आसपास तसेच चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत किंवा लेंडी खत अशा प्रकारची खते आपल्याला वापरायची आहेत.
 • तसेच यानंतर आपण आपल्या शेतामध्ये हिरवळीचे खते टाकतो म्हणजेच की आपण वेगवेगळे हिरवळीची पिके तर पाहिलीच असतील म्हणजे ताग,चवळी या प्रकारची हिरवळीची पिके आपल्याला आपल्या शेतात घ्यायची आहेत, आणि अशा हिरवळीच्या पिकांना फुल येईपर्यंत आपल्याला वाढवायचे आहे आणि फुल आल्यानंतर ती पिके आपल्या शेतामध्ये आपल्याला गाडून टाकायची आहेत.
 • यामुळे आपल्या शेताला चांगल्या प्रकारचे हिरवळीचे खत म्हणजे सेंद्रिय खत प्राप्त होते त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीचा पोत सुधारते उत्पादन क्षमता वाढवते
 • यानंतर जर आपल्याकडे कोंबडी खत असेल तर ते आपण पाचशे किलोच्या आसपास आपल्या शेतामध्ये टाकू शकतो परंतु टाकण्याआधी आपल्याला ते खत एक दोन वेळा वर खाली करून मिसळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामधील उष्णता ही बाहेर पडेल आणि त्यानंतरच आपल्याला ते खत आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे.
 • अशा प्रकारची सेंद्रिय खते जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये टाकली तर नक्कीच तुमच्या पिकाला चांगलं उत्पादन प्राप्त होईल आणि उत्पादन वाढीस देखील मदत होईल आणि त्याचबरोबर एक व्यवस्थित खत व्यवस्थापन तुमच्या पिकाला होईल.
 • याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेगवेगळे कृषी अधिकारी किंवा कृषी शास्त्रज्ञ सांगतात की सेंद्रिय शेती करताना आपण वेगवेगळे जिवाणू देखील आपल्या शेतामध्ये सोडू शकतो, ज्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद विरघळणारे जिवाणू, किंवा पालाश वहन करणारे जिवाणू असतील अशा प्रकारच्या जिवाणूंचा सेंद्रिय शेतीमध्ये आपण वापर करू शकतो.

अशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल तरीपण सर्व शेतकरी बांधवांकडून हीच अपेक्षा आहे कि आपले पर्यावरण खूप धोक्यात चालले आहे याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा . आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

मत्स्यपालन व्यवसायाची माहिती

मातीचे परीक्षण केल्याने शेतीत काय फायदे होतात जाणून घ्या ?   

 

Mushroom farming: भारतातील मशरूम शेती व्यवसाय करून कमवा महिन्याला लाखो रुपये.

1 thought on “सेंद्रिय शेतीचे मानवी जीवनातील महत्व काय ? | Sendriya Shetiche Mahtav future Farming In Marathi 2023 | Organic Farming”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?