संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी ‘ अभियान | Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023 GR, Online Registration संपूर्ण माहिती मराठी

 संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी ‘ अभियान संपूर्ण माहिती मराठी | Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023 | शासन आपल्या दारी योजना लाभ , उद्दिष्ट्य, लाभ प्रक्रिया, शासन आपल्या दारी योजना GR, शासन आपल्या दारी योजना ऑनलाईन अर्ज Online Registration, Shasan Aplya Dari Abhiyaan  अंतर्गत येणाऱ्या योजना कोणत्या? Shasan Aplya Dari Yojana 2023 अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम आणि कार्यक्रम संबंधित संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत .

‘शासन आपल्या दारी ‘ अभियान (Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023):-

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.  राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मुख्यमंत्री महोदयांच्या मुख्य उपस्थितीतभव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी 22 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी 

शासन आपल्या दारी योजनेचा लाभ (Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023) :-

 • भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून कमीतकमी एकूण 75,000 नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.
 • महाराष्ट्रातील मित्रांनो शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने करण्यात येणार आहे
 • यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर तालुका कल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
 • कमीत कमी कालावधीत विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यपद्धतीदेखील निश्चित केली गेली आहे.
 • नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहेत.
 • सर्वसामान्य नागरिकांना अशा योजनांची माहिती देखील नसते. अश्या नागरिकांना या अभियानाअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे .
 • राज्यातील सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे.
 • या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जात आहे.
 • जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
 • या शासन अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येत आहे.
 • शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकाच छताखाली एकत्र येऊन आपल्याला विविध योजनांची माहिती देतील.
 • त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतील.
 • या सगळ्यांची माहिती आणि त्याची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने अर्जदारांना इतरत्र कुठे जावे लागणार नाही आणि संबंधित विभागाच्या योजनेचा लाभ घेता येईल.

 

बांधकाम कामगार योजना संपूर्ण माहिती मराठी 2023

‘शासन आपल्या दारी ‘अभियान ( Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023) अंतर्गत योजनांचा समावेश :-

Shasan Aaplya Dari Yojana
Shasan Aaplya Dari Yojana
 • कृषी सेवा केंद्राचे परवाने
 • सेवानिवृत्त लाभ
 • पॅन कार्ड
 • पासपोर्ट
 • ई-श्रम कार्ड
 • पीएम किसान
 • विवाह नोंदणी
 • पीएफ घरकुल योजना
 • मनरेगा
 • आधार कार्ड
 • जॉब कार्ड
 • शिकाऊ चालक परवाना
 • मुलींना सायकल वाटप
 • नवीन मतदार नोंदणी
 • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ
 • कृषी प्रदर्शन
 • भरती मेळावा
 • डिजिटल इंडिया
 • सखी किट वाटप
 • दिव्यांग साहित्य वाटप

अशे वेगवेगळे योजनांचा यात समावेश असणार असून, ह्याच योजना आता आपल्या दारी येणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2023 मराठी

‘शासन आपल्या दारी ‘ अभियाना अंतर्गत कार्यक्रम शिबीर (Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023):-

शासन आपल्या दारीसोबतच विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे.

 1. रोजगार मेळावे
 2. आरोग्य शिबिर
 3. रक्तदान शिबिर
 4. दिव्यांगांना साहित्याचे वाटप
 5. कृषी प्रदर्शन
 6. शेतकरी ते ग्राहक थेट बाजार

यांच्या आयोजनासोबत नवीन मतदारांची नोंदणीही या ठिकाणी केली जाईल. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय कार्यालयाशी आपण संपर्क साधावा हे अभियान यशस्वी करण्यास मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावे. हे अभियान सर्वांना घेऊन यशस्वी करायची आहे.

‘शासन आपल्या दारी ‘ अर्ज प्रक्रिया (Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023 Application Process ):-

मुख्यमंत्री सचिवालयाचे Shasan Aaplya Dari Yojana Abhiyan 2023  या योजनेवर पूर्ण नियंत्रण आहे. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेता येणार. या अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सीएससी( CSC ) , ‘एमएससीआयटी’ ( MSCIT ) कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्समधील स्वयंसेवकांची मदत घेऊन नागरिकांना नोंदणी करता येणार आहे. नागरिकांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना जोडधंदे करण्यासाठी शासनातर्फे भरीव निधीची तरतूद देखील करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजना अभियान 2023 साठी अर्ज कसा करावा ?                                                            महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत अर्ज करण्याची पद्धत अद्याप उपलब्ध नाही परंतु तुम्ही थेट शिबिरांमध्ये जाऊन कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करू शकता.

 Shasan Aaplya Dari Abhiyan योजना 2023 साठी पात्रता काय आहे ?
जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असले पाहिजे आणि तुम्ही कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करत असाल.

महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजनेचे फायदे काय आहेत?
या योजनेच्या मदतीने महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांसाठी लोक अर्ज करणार आहेत.

महाराष्ट्र शासन आपल्या दारी योजना म्हणजे काय ?                                                                                                        शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने करण्यात येणार आहे, याच योजनेला शासन आपल्या दारी योजना म्हणतात.

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?