लहान मुलांना होऊ शकतो जीवाला धोका ! Side Effect of Mobile Phones in 2023 मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम

मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांना होऊ शकतो जीवाला धोका ! Side Effect of Mobile Phones in 2023 अनेकदा लहान लहान मुलं तासनतास मोबाईलमध्ये घुसलेली असतात. हल्ली तर अभ्यास, मित्रमैत्रीणींसोबत संवाद आणि खेळ देखील मोबाईलमध्येच होतात. पण पालकांना हे माहित असणं फार गरजेचं आहे की मोबाईलच्या अतिवापराने मुलांना कोणते आजार होऊ शकतात आणि मोबाईल वापरणं किती धोकादायक आहे. या लेखात आपण मोबाइलमुळे लहान मुलांवर काय काय परिणाम होतात या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत.

मुलांना लहानपणापासून एक वेगळीच सवय लागते. त्यांच्या हातात मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बघत नाही. कार्टून बघत, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे. अर्थात ही सवय लागण्याला पालक सुद्धा तितकेच जबाबदार असतात. लहान असताना तो जेवत नाही हे पाहून पालक त्याला मोबाईल दाखवून जेवण भरवायला सुरुवात करतात. तर मुलांना इथून पहिली मोबाईलची सवय लागते आणि मग पुढे पुढे जस जसे ते मोठे होत जातात ही सवय इतकी वाढते की त्या मुलांना मोबाईल शिवाय दुसरं काही सुचत नाही.परंतु या लागलेल्या सवयीमुळे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहेत हे त्यांना माहित नसते .

सावधान ! राज्यात सगळीकडे पसरली डोळ्यांची साथ | Eye Flu Viral Diseases

 

मोबाइलमुळे होणारे दुष्परिणाम (Side Effect of Mobile Phones in 2023):-

सतत २४ तास त्यांच्या हातात मोबाईल असतो. वेळीच पालकांनीही आवर न घातल्याने मूल सुद्धा मग ऐकून घेत नाही आणि नाईलाजाने पालकांना त्याचा हट्ट पुरवावा लागतो. पण मंडळी ही सवय अतिशय वाईट आहे. एवढ्या लहान वयात मोबाईलचा अतिवापर तुमच्या मुलाभोवती अनेक आजारांचा विळखा घालण्यास कारणीभूत ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला या विशेष लेखातून हेच सांगणार आहोत की असे काय आजार आहेत जे मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या मुलाला त्रस्त करू शकतात.

कॅन्सरचा धोका :-

तुमचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक अभ्यासपूर्ण संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की मोबाईल फोन मधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशन खूप काळ मोबाईलचा वापर केल्याने त्वचेतील उतीकांद्वारे शोषली जातात. लहान वयात या उतिका विकसित होत असतात, त्या तितक्या सक्षम नसतात. त्यामुळे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडीएशनचा त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवतो.

टीन टेंडोनाइटिस :-

जर मुलांना लहान वयातच मोबाईलची सवय लागली तर सगळ्यात पहिलं ते शिकतात मेसेज टाईप करायला. आपल्या आई वडिलांना पाहून त्यांना सुद्धा मेसेज पाठवण्याची सवय पडते. जस जसे मोठे होत जातात तस तशी चॅटिंगची सवय सुद्धा त्यांना लागते. पण यामुळे त्याला टीन टेंडोनाइटिस हा विकार होऊ शकतो. या विकाराला टीटीटी असेही म्हणतात. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात. याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय यामुळे नजर सुद्धा प्रभावित होते.

तणाव :-

पूर्ण दिवस फोनचा वापर केल्याने आणि सोशल मिडीयाच्या दुनियेत रमल्याने खऱ्या आयुष्यातले मित्र, खेळ यांच्या बाबतीत मुले दूर जाऊ लागतात. त्यांना आपले मोबाईलचे जग जास्त आवडू लागते. अनेक संशोधनातून हे दिसून आले आहे की मोबाईल जास्त वापरणाऱ्या मुलांमध्ये थकवा, ताण आणि तणाव मोठ्या प्रमाणावर असतो. काही प्रकरणांत तर यातून मानसिक आजार निर्माण झाल्याचे सुद्धा दिसून आले आहे. त्यामुळे (Side Effect of Mobile Phones) हा धोका ओळखून आपल्या मुलाच्या मोबाईल वापरावर मर्यादा आणायला पाहिजे.

झोप न येणे :-

ही समस्या मोठ्यां माणसांना सुद्धा खूप सतावते आणि लहान मुलांना सुद्धा ! अर्थात दोन्हीमध्ये मोबाईलचा अतिवापर हे कारण असते. सतत फोनवर असल्याने झोपेचे भान राहत नाही. हळूहळू झोपेची वेळ सुटते आणि कधीही रात्री अपरात्री झोप येते आणि सकाळी झोप पूर्ण सुद्धा होत नाही. मुलांना याचा मोठा फटका बसू शकतो. कारण झोप न आल्याने आणि ती पूर्ण न झाल्याने त्यांच्या शालेय जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. मुलाची क्षमता कमकुवत पडू शकते.

राहणीमानात बदल :-

मोबाईलच्या सवयीमुळे लहान मुले स्वभावाने खूप चीड चीड करत असता आई वडिलांच ऐकत नसतात
त्यांना मोबाईलच जास्त जवळचा वाटत असतो , अश्याच (Side Effect of Mobile Phones) सवयीमुळे कितीतरी दुर्घटना झाल्या आहेत

चिंता :-

सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे आणि मुलं देखील त्यापासून दूर नाहीत. सोशल मीडियाचं जग जितकं मन रिफ्रेश करणारं आहे तितकंच ते चिंता वाढवणारं आहे. माझ्या फोटोला लाईक्स येत नाही. मी अजून कसा फेमस होऊ? माझा मित्र जास्त फेमस आहे. तो माझ्याशी बोलत नाही, ती माझ्याशी बोलत नाही. अशा अनेक गोष्टी मुलांच्या चिंता वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि या चिंतेत अडकल्यावर डिप्रेशनमध्ये येऊन मुले काहीही करू शकतात. म्हणून त्यांच्या मोबाईलच्या अतिवापराला वेळीच आवर घाला आणि त्यांना सुरक्षित ठेवा.

10 वी 12 वी मार्कशीट डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये 

 

तर मित्रांनो लहान मुलांना मोबाइल द्या परंतु त्याचा वापर फक्त कामापुरतेच झालं तर खूपच छान यामुळे त्यांच्यावर होणारे (Side Effect of Mobile Phones) दुष्परिणाम टाळले जातील, या लेखात सांगितल्या प्रमाणे सर्व माहिती समजली असेल माहिती चांगली वाटल्यास इतरांना share करा. धन्यवाद…

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?