Sukanya Samriddhi Yojana 2024: सुकन्या समृद्धी योजनेतुन मुलीचे भविष्य करा सुरक्षित ..

Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजना  ही वित्त मंत्रालयाची एक लहान ठेव योजना आहे जी केवळ मुलींसाठी आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून माननीय पंतप्रधानांनी 22 जानेवारी 2015 रोजी Sukanya Samriddhi Yojana लाँच केले. मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागवण्यासाठी ही योजना आहे. सुकन्या समृद्धी योजना बद्दल संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत …

Table of Contents

Sukanya Samriddhi Yojana in marathi 

भारत सरकारने 14 डिसेंबर 2014 रोजी अधिसूचित केलेली, ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करत असते . सुकन्या समृद्धी योजनेसाठी पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांद्वारे आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँका उदा. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्यरत आहे . मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात. मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असावी. मुलीसाठी फक्त एकच खाते मंजूर आहे.

योजनेचे नाव Sukanya Samriddhi Yojana 

सुकन्या समृद्धी योजना

कोणी सुरू केलीकेंद्र सरकार / पंतप्रधान नरेंद्र मोदी
विभागमहिला व बाल विकास विभाग
कधी सुरू केली22 जानेवारी 2015
लाभार्थीकुटुंबातील लहान मुली
लाभआर्थिक सहाय्य
उद्देशमुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे.
अर्ज करण्याची पद्धतपोस्ट ऑफिसच्या माध्यमातून

 

एक कुटुंब फक्त दोन Sukanya Samriddhi Yojana खाती उघडू शकतात. किमान गुंतवणूक ₹250 प्रतिवर्ष आहे; कमाल गुंतवणूक ₹1,50,000 प्रतिवर्ष आहे. परिपक्वता कालावधी 21 वर्षे आहे. सध्या, Sukanya Samriddhi Yojana चे अनेक कर लाभ आहेत आणि सर्व लघु बचत योजनांमध्ये सर्वाधिक व्याज दर म्हणजे 7.6%. जमा केलेली मूळ रक्कम, संपूर्ण कार्यकाळात मिळालेले व्याज आणि परिपक्वता लाभ करमुक्त आहेत. मूळ रक्कम कलम 80C अंतर्गत ₹1,50,000 पर्यंत कपात करण्यायोग्य आहे. योजनेच्या प्रारंभापासून, योजनेअंतर्गत सुमारे 2.73 कोटी खाती उघडण्यात आली आहेत, ज्यात जवळपास ₹ 1.19 लाख कोटी ठेवी आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य उद्देश (Sukanya Samriddhi Yojana Main Purpose )काय ?

  1. मुलीचे शिक्षण,आरोग्य, मुलीचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशानं सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  2. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  3. मुलींना भविष्यात सन्मानाने जगता यावे या दृष्टीने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
  4. राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
  5. भविष्यात मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  6. मुलींना भविष्यात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने या योजनेची शुरुवात करण्यात आली आहे.

 

Sukanya Samriddhi Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना pm-kisaan-samman-nidhi-2023: 

सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये (Sukanya Samriddhi Yojana Features) कोणते ?

  • राज्यातील मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून मुलीचे वय २१ वर्ष होईपर्यंत निर्धारित केला गेला आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी मुलीचे वय २१ वर्षे होईपर्यंत केला गेला असला तरी सुरुवातीच्या फक्त १५ वर्षांपर्यंतच योजनेअंतर्गत पैसे जमा करायचे आहेत.
  • मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले तर त्या मुलीला सुकन्या समृद्धी योजनेतुन रद्द केले जाईल व व सदर खाते बंद केले जाईल व या योजनेचा लाभ मुलीच्या पालकांना घेता येणार नाही.
  • मुलीचे वय २१ वर्षे होऊन गेल्यावर सुद्धा जर लाभार्थी सुकन्या समृद्धी योजनेच्या बचत खात्यातून पैसे काढत नसेल तर त्या जमा रकमेवर सुद्धा व्याज दिले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान २५०/- रुपये भरणे आवश्यक आहे तसे न केल्यास सदर खाते बंद केले जाईल व खाते पुन्हा सुरू करण्यासाठी जितकी वर्षे खाते बंद असेल त्या प्रत्येक वर्षाला ५०/- रुपये दंड आकारून खाते पुन्हा सुरू केले जाईल.
  • सुकन्या समृद्धी योजना १०० टक्के सुरक्षित योजना मानली जाते.
  • सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा एखाद्या कारणामुळे मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजा सकट लाभार्थ्याच्या पालकांना दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत जमा रकमेवर टॅक्स भरावा लागत नाही.
  • मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यावरच मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तसेच तिच्या आरोग्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून फक्त ५० टक्के रक्कम काढता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेपासून मिळणारे फायदे ( Sukanya Samriddhi Yojana Benefits )-

  1. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होते.
  2. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास चांगला व्याजदर मिळतो.
  3. सुकन्या समृद्धी योजना एक अत्यंत कमी गुंतवणूक बचत योजना आहे.
  4. या योजनेत सरकारकडून पैशाची हमी दिली जाते.
  5. या योजनेत पैसे बुडण्याची शक्यता नाही.
  6. मुलीचे शिक्षण, मुलीचे आरोग्य, मुलीचे लग्न व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक उत्तम बचत योजना आहे.
    देशातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ घेता येतो.
  7. कुटुंबातील प्रत्येक मुलीला सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येतो.
  8. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून लाभ घेता येतो.
  9. जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळते.
  10. या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा असला तरी लाभार्थ्याला फक्त १५ वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात पुढील १५ ते २१ वर्षे पैसे भरावे लागत नाहीत.
  11. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून फक्त १००/- रुपये प्रतिवर्ष इतका हप्ता जमा करून सदर मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरवला जातो ज्यामुळे पालकाचा अपघात अथवा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या वारसाला किमान ३००००/- रुपये ते ७५०००/- रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
  12. आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला ६००/- रुपये शिष्यवृत्ती प्रति ६ महिने आठवी नववी दहावी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षक असताना दिली जाते.
  13. अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

सुकन्या समृद्धी योजनेपासून होणारे नुकसान (Sukanya Samriddhi Yojana Disadvantages ) –

  • या योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचा कालावधी खुप मोठा म्हणजे 21 वर्षाचा असतो.
  • या योजनेअंतर्गत सध्या दिला जाणारा व्याजदर 7.6 टक्के आहे त्यामुळे खुप वर्ष गुंतवणूक करून सुद्धा कमी लाभ दिला जातो, जो म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधे  गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा पेक्षा कमी आहे.
  • या योजनेअंतर्गत अधिकतम गुंतवणूक 1.5 लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास जास्त रकमेवर व्याज दिले जात नाही.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या 21 वर्षाच्या आत झाल्यास मुलीला या जोजनेचा लाभ घेता येत नाही व तीला या योजनेमधून रद्द केले जाते.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ( Documents ) –

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  •  पॅन कार्ड
  •  आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र
  •  रेशन कार्ड
  •  विज बिल
  •  मुलीच्या आई-वडिलांचा फोटो  रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसने विनंती केलेली इतर कोणतीही कागदपत्रे.

टीप –  कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे हे मुलीच्या आईवडिलांचे असणे आवश्यक आहे जर मुलीचे आई-वडील नसतील तर अशा            परिस्थितीत मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता ( Eligibility)-

  • मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षाची होईपर्यंत या कालावधीत सुकन्या समृद्धी योजना खाते उघडणे गरजेचे आहे म्हणजेच सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ फक्त १० वर्षाखालील मुलींनाच घेता येईल.
  • जर एखाद्या कुटुंबात २ मुली असतील आणि दोन्ही मुलींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सुकन्या योजनेच्या २ खाती उघडून याचा लाभ घेता येईल.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यात रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा कोअर बँकिंग सिस्टम च्या साह्याने पैसे भरता येतात.
  • मुलीचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट पालकांच्या स्वाधीन केली जाते व सदर खाते बंद केले जाते.
  • मुलीचे नाव न ठेवले गेले असल्यास आईच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडता येते ते पुढे जाऊन बदलून मुलीच्या नावावर करता येते.
  • फक्त मुलींना या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
  •  मातेच्या दुसऱ्या प्रसूती वेळी जर जुळ्या किंवा तिळ्या मुली झाल्यास त्यांना ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेच्या रकमेचे जमा केलेल्या रकमेचा आराखडा (Schedule) –

   Year 

   

Opening Balance

     

    Deposit

 

  Interest

 

Closing Balance

 

1050003805380
25380500078911169
3111695000122917398
4173985000170224100
5241005000221231312
6313125000276039071
7390715000334947421
8474215000398456405
9564055000466766071
10660715000540176473
11764735000619287665
12876655000704399707
139970750007958112665
1411266550008943126607
1512660709622136230
16136230010353146583
17146583011140157723
18157723011987169710
19169710012898182608
20182608013878196487
21196487014933211420

 

सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दरवर्षी ५०००/- रुपये गुंतवणूक केल्यास १४ वर्षांनी ७.६ टक्के व्याज दराने चक्रवाढ व्याज पद्धतीने १२६६०७/- इतकी रक्कम मिळेल तर २१ वर्षाला एकूण २११४२०/- रुपये मिळतील. तुम्ही जितकी जास्त रक्कम सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक कराल तितका जास्त परतावा तुम्हाला २१ वर्षानंतर मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेतुन मिळणारे जुने व्याजदर ( interest rates )-

 

     वर्ष (Years)      व्याजदर

( interest rates)

3.12.2014 ते 31.03.2015      9.1
01.04.2015 ते 31.03.2016      9.2
01.04.2016 ते 30.09.2016      8.6
01.10.2016 ते 31.03.2017      8.5
01.04.2017 ते 30.06.2017      8.4
01.07.2017 ते 31.102.2017      8.3
01.01.2018 ते 30.09.2018      8.1
01.10.2018 ते 30.06.2019      8.5
01.07.2019 ते 31.03.2020      8.4
01.04.2020 ते 30.12.2021      7.6

सुकन्या समृद्धी योजनेतुन मिळणारे व्याजदर ( interest rates )-

सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात २०१५ साली केली गेली त्या वेळी व्याजदर ९.१ टक्के होता. वर्तमान स्तिथीमध्ये हाच व्याजदर कमी होऊन ७.६ टक्के आहे म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या चढ-उतारावर सदर व्याजदर अवलंबून असतो.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या खालीलप्रमाणे यादी 

खालीलीपैकी सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत सुकन्या समृद्धी बँक खाते उघडता येते.

  • इंडियन ओवसीज बँक Indian Overseas Bank
  • इंडियन बँक Indian Bank
  • आईडीबीआई बँक IDBI Bank
  • आईसीआईसीआई बँक ICICI Bank
  • देना बँक Dena Bank
  • कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
  • सेंट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India
  • केनरा बँक Canara Bank
  • बँक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra
  • बँक ऑफ इंडिया Bank of India
  • बँक ऑफ बड़ौदा Bank of Baroda
  • एक्सिस बँक Axis Bank
  • आंध्रा बँक Andhra Bank
  • इलाहाबाद बँक Allahabad Bank
  • भारतीय स्‍टेट बँक State Bank Of India
  • स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore
  • स्टेट बँक ऑफ पटियाला State Bank of Patiyala
  • विजया बँक Vijaya Bank
  • यूनियन बँक ऑफ इंडिया,
  • यूको बँक Uco Bank
  • सिंडिकेट बँक Syndicate Bank
  • पंजाब एंड सिंध बँक Panjab and Sind Bank
  • ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank of Commerce
  • स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपुर State Bank of Bikaner and Jaipur
  • यूनाइटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
  • पंजाब नेशनल बँक Panjab National Bank

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँकेत अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत खालीलप्रमाणे (Application Process)-

Sukanya Samriddhi Yojana चा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे खाली दिलेल्या स्टेप नुसार अर्ज करा.

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज बँकेत जमा करावा.
  • बँकेकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना बँकेकडून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
  • अशा प्रकारे बँकेच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करण्याची व खाते उघडायची पद्धत खालीलप्रमाणे  (Registration By Post Office Application Process) –

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे किंवा आपल्या जवळच्या शाखेच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • सदर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी आणि सदर अर्ज पोस्टात जमा करावा.
  • पोस्टाकडून जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
  • त्यानंतर सुकन्या योजनेचे खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.
  • पैसे जमा केल्यावर लाभार्थ्यांना पोस्ट ऑफिस मधून एक पासबुक दिले जाईल ज्यामध्ये खातेदाराला १५ वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतील.
  • अशा प्रकारे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

आशा आहे कि आपल्याला संपूर्ण माहिती समजली असेल आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर इतरांना पाठवा शेअर करा . व काही प्रश्न असतील तर कंमेंट करा धन्यवाद …..

कोणत्या राज्यात किती खाते उघडले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलीचे कोणतेही कायदेशीर पालक किंवा पालक त्यांच्या मुलीच्या वतीने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात.

नाही. फक्त 50% पर्यंत आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे आणि ती देखील जेव्हा मुलगी किमान 18 वर्षांची झाली असेल. ही रक्कम फक्त मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी काढता येते.

2014-15 मध्ये, व्याज दर वार्षिक 9.1% होता. 2015-16 मध्ये, व्याज दर वार्षिक 9.2% पर्यंत वाढला. 2016-17 मध्ये व्याजदर 8.6% पर्यंत कमी झाला. मार्च २०२३ पर्यंत, व्याज दर ७.६% आहे.

मुलीच्या कायदेशीर पालक किंवा पालकाचा मृत्यू झाल्यास, ही योजना एकतर बंद केली जाते आणि त्यातून मिळणारी रक्कम कुटुंबाला किंवा मुलीला दिली जाते. किंवा, ही योजना मॅच्युरिटी कालावधीपर्यंत जमा केलेल्या रकमेसह चालू ठेवली जाते आणि मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत राहते.

2 thoughts on “Sukanya Samriddhi Yojana 2024: सुकन्या समृद्धी योजनेतुन मुलीचे भविष्य करा सुरक्षित ..”

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?