Vihir Anudan Yojana 2023: विहिरीसाठी अर्ज करताय, विहीर अनुदान योजना 2023 अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती.

नमस्कार मित्रांनो, आज आपण विहीर अनुदान योजना 2023 | Vihir Anudan Yojana 2023 मागेल त्याला विहीर | Vihir Anudan Yojana बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला ही योजना वापरायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.  चांगला निधी असलेला कार्यक्रम म्हणजे काय, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, निकष, विहीर अनुदान योजना , विहीर अनुदान योजनेचे लाभ कोणते चांगल्या अर्थसहाय्यित कार्यक्रमाचे फायदे काय आहेत? विहीर अनुदान योजना साठी अर्ज कसा करावा? या लेखात आपण सर्व माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव विहीर अनुदान योजना आहे. या योजनेला मागेल त्याला विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.

विहीर अनुदान योजनेचा उद्देश (Vihir Anudan Yojana 2023 Objectives):-

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
  • विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्याचे भविष्य उज्वल बनविणे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकयांना शेतात विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहॆ.

Vihir Anudan Yojana 2023

 

 

जननी सुरक्षा योजना (JSY) संपूर्ण माहिती मराठी 2023

विहीर अनुदान योजनेचा लाभ (Vihir Anudan Yojana 2023 Benifits ):-

  • मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
  • राज्यातील शेतकरी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकयांना विहीर खोदण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना माहिती मराठी

विहीर अनुदान योजनेची वैशिष्ट्ये (Vihir Anudan Yojana 2023 Features):-

  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे मागेल त्याला (Vihir Anudan Yojana 2023) विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहॆ.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक महत्वाची अशी एक योजना आहॆ.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी एक महत्वाचे असे पाऊल मानले जाते आहॆ.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखण्यात येते आहॆ.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली विहीर अनुदान योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे योजनेत घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले आहे

विहीर अनुदान योजनेच्या अटी & नियम (Vihir Anudan Yojana 2023 Terms & Condition):-

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे गरजेचे आहे.
  • शेतात आधीच विहीर असता कामा नये.
  • अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी  विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
  • लाभधारकाकडे किमान 0.60 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
  • शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
  • दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीच्या 7/12 उताऱ्यावर वर यापूर्वी विहिरीची नोंद नसवी.
  • लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
  • लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.60 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

 विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Vihir Anudan Yojana 2023 Documents):-

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. मोबाईल नंबर
  5. ई-मेल आयडी
  6. उत्पन्नाचा दाखला
  7. बँक खात्याचा तपशील
  8. जमिनीचे कागदपत्रे ७/१२ व ८अ
  9. पासपोर्ट आकाराचे फोटो
  10. रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
  11. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
  12. सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना pm-kisaan-samman-nidhi-2023:

विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत (Vihir Anudan Yojana 2023 Application Process ):- 

इच्छुक लाभार्थ्याने सर्व प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल सर्व माहिती भरून ग्रामपंचायतीमध्ये सबमिट करावे . विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमुना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) , ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

विहीर अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी (Vihir Anudan Yojana 2023):-

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
  • जॉब कार्ड धारक व्यक्ती
  • जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  • नीरधीसूचित जमाती
  • अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
  • सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे

या सर्व लोकांना विहीर अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे .

निष्कर्ष:-

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल तसेच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल , विहीर अनुदान योजनेत (Vihir Anudan Yojana 2023) योजनेचे  फायदे , त्याचे उद्दिष्टे , विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया , आवश्यक कागदपत्रे,लाभ इ . सर्व बाबींचा समावेश केला आहे .

प्रधानमंत्री मुद्रा योजना माहिती मराठी 

अटल पेंशन योजना माहिती मराठी

Leave a Comment

Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ? द केरला स्टोरी स्टार अदा शर्माचा हा नवा लुक होत आहे वायरल ! Pro kabaddi league सीजन दहाच्या ह्या आहेत बारा टीम ? बाहुबली प्रभास ची सालार मूवीमध्ये हे आहेत कलाकार .. virat kohli net worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती पाहून व्हाल चक्क ! AUS vs AFG: इंटरनेटवर वायरल तुफानी फलंदाज ग्लेन मॅक्सवेल! मिळाल्या भरभरून शुभेच्या Mohammed shami new record : विश्वचषकात मोहम्मद शमीने बनवला नवा रेकॉर्ड
लवकरच टमाटरचे भाव कमी होणार आहे ! पहा भाववाढीच कारण ? चंद्रयान ३ चे आकाशातील आकर्षक दृश्य Chandrayan 3 live update Photos हे आहे वाघाची नवीन प्रजाती ! bengal tiger in india Tiger Jinda hai डोळे आल्यास ही लक्षणे दिसतात ! Eye Flu Viral Symptoms डोळ्याची साथ डोळे आल्यावर करा हे उपाय ! eye flu conjunctivitis treatment
Redmi 13C 5G Price: फक्त 9999 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन Tripti Dimri: अॅनिमल चित्रपटातील कोण आहे ही झोया भाभी ? Buddhist flag: बौद्ध ध्वजाच्या रंगांचे महत्त्व कोणते ? Maharashtra tourism: महाराष्ट्रातील हे आहेत पाच फेमस पर्यटन स्थळे ?